Shatrughan Sinha On Tiger Shroff Car Firing Incident : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर रविवारी 18 ऑक्टोबरच्या रात्री तीन अज्ञात लोकांनी गोळीबार केला. यात टायगरला सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही मात्र त्याच्या ड्रायव्हरला मात्र गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झालाय. या घटनेची जबाबदारो बिष्णोई गॅंगने स्वीकारली आहे. टायगर श्रॉफ सोबत झालेल्या या धक्कादायक घटनेविषयी फॅन्स सोशल मीडियावर शोक व्यक्त करत असून गोळीबार करणाऱ्या आरोपींना आणि या हल्ल्यामागील मूळ सूत्रधारांना पोलिसांनी लवकरात लवकर पडकून कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे. या दरम्यान बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची रिऍक्शन समोर आली आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केली चिंता :
दिग्गज अभिनेते आणि राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपला राग आणि चिंता व्यक्त केली. त्यांनी लिहिले की टायगर श्रॉफवर झालेला हा हल्ला अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे. टायगरचे वडील जॅकी श्रॉफ यांचा उल्लेख करत, त्यांनी म्हटले आहे की, सुदैवाने टायगर सुरक्षित बचावला, परंतु त्याचा चालक गंभीर जखमी झाला आहे. या गंभीर घटनेच्या संदर्भात तातडीने आणि कठोर कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना केले आहे.
What's happening???? Yesterday's shocking, worrying attacks, threats, targeting & firing on most loved star TIGERSHROFF worthy son of the most worthy father bindasbhidu. In fact Tiger was lucky to go unhurt, but his poor driver was injured badly. Honble CM, Maharashtra Dev_Fadnavis & https://t.co/7lovDa6k89. mieknathshinde seem to be extremely concerned on this serious matter. Jai Hind! YashwantSinha MamataOfficial ArvindKejriwal SanjayAzadSln
Shatrughan Sinha (ShatruganSinha) October 19, 2026
अभिनेत्री पवित्रा पुनिया हिने देखील टायगर श्रॉफच्या कारवर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेवर सोशल मीडियावर भाष्य केले आहे. तिने लिहिले आहे की, ही घटना इतकी भयावह आहे की ज्यामुळे कोणाचेही संपूर्ण शरीर थरथरू लागेल. सुदैवाने टायगर पूर्णपणे सुरक्षित आहे. ज्याबद्दल तिने देवाचे आभार मानले आहेत. मुंबई पोलीस आणि देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास व्यक्त करत, पवित्राने दोषी व्यक्तीला लवकरच अटक होईल, अशी आशा व्यक्त केली.
गायक मिका सिंहने सुद्धा केली पोस्ट :
प्रसिद्ध गायक मीका सिंहने सुद्धा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. यात त्याने मुंबईच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तो म्हणाला की, 'मुंबईला नेहमीच देशातील सर्वात सुरक्षित शहर मानले गेले आहे, जिथे लोक रात्रीच्या वेळीही सुरक्षितता अनुभवतात. मात्र या घटनेमुळे सर्वजण भयभीत झाले आहे'. मिकाने सरकार आणि प्रशासनाला विनंती केली आहे की, त्यांनी या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहावे आणि आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करावी, जेणेकरून शहरात सुरक्षिततेची भावना कायम राखता येईल.