• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यावरून कुटुंबात वाद? जया बच्चन यांच्या नावावरील गिफ्ट डीडला कुटुंबातूनच आव्हान

अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यावरून कुटुंबात वाद? जया बच्चन यांच्या नावावरील गिफ्ट डीडला कुटुंबातूनच आव्हान

अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याच्या मालकीवरून वाद समोर आला आहे. रामोला बच्चन यांनी जया बच्चन यांच्या नावावरील 1993 च्या गिफ्ट डीडला आव्हान देण्यात आले आहे.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 12, 2026, 21:23 IST|Updated: Nov 12, 2026, 22:53 IST
joinshare
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यावरून कुटुंबात वाद? जया बच्चन यांच्या नावावरील गिफ्ट डीडला कुटुंबातूनच आव्हान
Image Credit: जलसा बंगला

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील ‘जलसा’ या प्रसिद्ध बंगल्याबाबत कौटुंबिक मालमत्ता वाद समोर आलाय. अमिताभ यांचे बंधू अजिताभ बच्चन यांच्या पत्नी रामोला बच्चन यांनी 1993 मध्ये जया बच्चन यांच्या नावावर करण्यात आलेल्या गिफ्ट डीडला आव्हान दिलंय. या व्यवहाराची आपल्याला माहिती नव्हती किंवा आपण त्याला संमती दिली नव्हती, असा दावा रामोला यांनी केलाय. या तक्रारीनंतर अंधेरी येथील सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयात सुनावणी सुरू आहे.

‘जलसा’च्या मालकीवरून वाद नेमका काय?

जलसा बंगल्याची नोंद सुरुवातीला रामोला बच्चन यांच्या नावावर होती. 1993 मध्ये गिफ्ट डीडद्वारे ही मालमत्ता जया बच्चन यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली. मात्र या व्यवहाराची आपल्याला माहिती नव्हती आणि आपली संमतीही घेतली गेली नव्हती, असा आक्षेप रामोला यांनी घेतलाय. गेल्या सात महिन्यांत त्यांनी नोंदणी प्राधिकरणाकडे अनेक तक्रारी दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई मिररने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

सरकारी प्रॉपर्टी कार्ड आणि सोसायटीच्या नोंदीत तफावत?

महाराष्ट्रात शहरी मालमत्तेच्या नोंदी आणि त्यातील बदल भूमिअभिलेख विभागाकडून सांभाळले जातात. मालमत्तेच्या नोंदींमधील कथित विसंगती हा या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा  आहे. कपूर हाउसिंग सोसायटीच्या नोंदींमध्ये जया बच्चन यांचे नाव मालक म्हणून असल्याचे सांगितले जाते. मात्र, सरकारी प्रॉपर्टी कार्डवर अद्याप रामोला बच्चन यांचे नाव असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रॉपर्टी कार्डवरील नाव बदलण्याच्या कथित प्रयत्नांनंतर हा वाद पुन्हा समोर आला.

1993 च्या गिफ्ट डीडवर आक्षेप

गिफ्ट डीड तयार करण्याच्या प्रक्रियेवरही रामोला यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, हा दस्तऐवज साध्या कागदावर तयार करण्यात आला होता, त्यावेळी मुद्रांक शुल्क भरले नव्हते आणि त्यावर साक्षीदारांच्या सह्या नव्हत्या, असे आरोप आहेत. नंतर या दस्तऐवजाची नोंदणी आणि अभय योजनेअंतर्गत नियमितीकरण कशा पद्धतीने झाले, याबाबतही त्यांनी आक्षेप घेतला. या सर्व बाबींची कागदपत्रांच्या आधारे तपासणी होणे आवश्यक आहे.

अंधेरी उपनिबंधक कार्यालयात सुनावणी

रामोला यांच्या तक्रारीची दखल अंधेरी येथील सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने घेतली आहे. उपनिबंधक फैयाज मुलानी यांनी तक्रार मिळाल्याची पुष्टी केली असून सुनावणी सुरू करण्यात आली. संबंधित पक्षांना आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आलंय. त्यामुळे या प्रकरणात आता दोन्ही बाजूंची कागदपत्रे आणि दावे तपासले जाणार आहेत.

‘जलसा’चा जुना इतिहासही चर्चेत

अमिताभ बच्चन यांचा हा बंगला पूर्वी ‘मन्सा’ नावाने ओळखला जात होता. तो निर्माते एन. सी. सिप्पी यांच्या मालकीचा होता. 1982 मधील ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटाच्या मानधनाच्या बदल्यात हा बंगला अमिताभ यांना मिळाला. पुढे त्यांनी तो विकला आणि नंतर पुन्हा विकत घेतला. अभिषेक बच्चन यांच्या प्रवक्त्यांनी हा अंतर्गत कौटुंबिक विषय असल्याचे सांगितले. तर अमिताभ बच्चन यांच्याकडूनही कोणती अधिकृत प्रतिक्रिया आली नाही.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Amitabh Bachchan
Mumbai
Entertainment News