• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /अक्षय खन्नाने मुंबईत खरेदी केला आलिशान फ्लॅट, किंमत वाचून तोंडात बोटं घालाल

अक्षय खन्नाने मुंबईत खरेदी केला आलिशान फ्लॅट, किंमत वाचून तोंडात बोटं घालाल

Akshay Khanna House In Mumbai : मलबार हिल हा मुंबईतील सर्वात महागड्या आणि प्रतिष्ठित परिसरांपैकी एक असून येथे बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाने आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटची किंमत वाचून अनेकांना घाम फुटेल.

Reported Bypooja pawar
Published: Oct 03, 2026, 09:33 AM IST|Updated: Oct 03, 2026, 10:20 AM IST
joinshare
अक्षय खन्नाने मुंबईत खरेदी केला आलिशान फ्लॅट, किंमत वाचून तोंडात बोटं घालाल

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Akshay Khanna House In Mumbai : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाने मुंबईतील सर्वात पॉश भाग असलेल्या मलबार हिल येथे एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. या प्रॉपर्टीची किंमत ही जवळपास 33.26 कोटी रुपये सांगितली जात आहे. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनशी निगडित दस्ताऐवजांनुसार  या प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन हे सप्टेंबर 2026 मध्ये झालं आहे. रियल एस्टेट डेटा आणि Square Yards यांनी याबाबत माहिती दिली आहे. मलबार हिल हा मुंबईतील सर्वात महागड्या आणि प्रतिष्ठित परिसरांपैकी एक असून, येथे अनेक बड्या व्यक्ती आणि व्यावसायिक घराण्यांच्या मालकीच्या मालमत्ता आहेत. अक्षय खन्ना यांच्याशी संबंधित हा नवीन मालमत्ता व्यवहार अशा वेळी झाला आहे. जेव्हा मुंबईतील उच्चभ्रू भागांमधील आलिशान घरांच्या मागणीबाबत सातत्याने चर्चा होत आहे.

अक्षय खन्नाने खरेदी केलं कोट्यवधींचं घर :

संपत्तीच्या कागदपत्रांनुसार सदर घर हे मुंबईतील सर्वात महागड्या आणि आवडत्या भागांपैकी असणाऱ्या मलबार हिल रोडवरील '30 लिटल गिब्स' येथे आहे. या इमारतीचा कारपेट एरिया 2,341.39 स्केवर फूट आहे. जे जवळपास 217.52 वर्ग मीटरच्या बरोबरीत आहे. यात 175.45 चौरस फुटांच्या बाल्कनी क्षेत्राचाही समावेश आहे, ज्यामुळे एकूण क्षेत्रफळ 2,516.84 चौरस फूट होते. या मालमत्तेमध्ये पार्किंगसाठी तीन जागा उपलब्ध आहेत.

मलबार हिलमध्ये 33.26 कोटींचं घर खरेदी केलं :

दक्षिण मुंबईत वसलेला आणि अरबी समुद्राचे विहंगम दृश्य अनुभवता येणारा हा परिसर आपल्या आलिशान घरांसाठी आणि येथील प्रीमियम दर्जाच्या मालमत्तेसाठी ओळखला जातो. या परिसरापासून नरिमन पॉइंट आणि फोर्ट यांसारख्या व्यावसायिक क्षेत्रांपर्यंत सहज पोहोचता येते. याव्यतिरिक्त मरीन ड्राइव्ह आणि कुलाबा यांसारखे भागही जवळच आहेत. मलबार हिल येथे मुंबईतील अनेक प्रसिद्ध स्थळे आहेत. यामध्ये हँगिंग गार्डन्स, कमला नेहरू पार्क, बाणगंगा तलाव आणि वाळकेश्वर मंदिर यांचा समावेश आहे.

अक्षय खन्नाची मनोरंजन क्षेत्रातील कारकीर्द :

अभिनेता अक्षय खन्ना हा बॉलिवूडचे दिवंगत अभिनेता विनोद खन्ना यांचा मुलगा असून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये तो मागील अनेक दशकांपासून काम करतोय. अक्षय खन्ना नुकताच त्याच्या धुरंदर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला, त्याच्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांवर मोहिनी घातली. अक्षय खन्नाच्या चित्रपटांच्या यादीत 'दिल चाहता है', 'हलचल', 'रेस' आणि 'गांधी, माय फादर' सारख्या चित्रपटांमध्ये सामील आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Entertainment News
News in Marathi
Mumbai