Iron Man Replacement : मार्वल स्टूडियोजकडून बनवण्यात आलेल्या 'आयर्न मॅन' हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. भारतात याचा प्रेक्षकवर्ग मोठा असून वर्ष 2013 मध्ये रिलीज करण्यात आलेल्या आयर्न मॅन 3 नंतर हे पात्र दुसऱ्या चित्रपटांमध्ये सुद्धा दिसून आलं. या दरम्यान मार्व्हलने त्यांचा अपकमिंग चित्रपट 'हल्क वॉर' मध्ये टोनी स्टार्कची नवीन ओळखीचा खुलासा केला आहे.
'आयरन मॅन' च्या नावात झाला बदल :
हल्क वॉर या चित्रपटात, सहसा आर्मर परिधान करणाऱ्या अव्हेंजरला आता 'आता 'द आयर्न थिंग' (The Iron Thing) नावाच्या एका जीवात रूपांतरित करण्यात आलं आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार, हे पात्र 'इन्फरनल हल्क'च्या विस्तारत असलेल्या सैन्याचा एक भाग आहे.
'आयरन मॅन' मध्ये झाले बदल :
हे रूपांतर आयर्न मॅनच्या सुप्रसिद्ध लाल सोनेरी चिलखतापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीवर अवलंबून राहण्याऐवजी, स्टार्क आता एका अवाढव्य आणि विचित्र आकाराच्या प्राण्यामध्ये रूपांतरित झाला आहे. ज्यामध्ये त्याच्या पारंपरिक तांत्रिक फायद्यांची जागा आता केवळ अफाट शारीरिक शक्तीने घेतली आहे.
चेहऱ्यावर असणार मास्क :
मीडिया रिपोर्ट्सनुसार एक युद्ध हरल्यावर स्टार्कमध्ये हे बदल करण्यात आलेले आहेत. नव्या रूपात त्याचं शरीर खूप विशाल असून त्याने साधारणपणे राखाडी रंगाचा मास्क घालता आहे. त्याखाली त्याचा खरा चेहरा लपून राहतो. 'द आयरन थिंग' हा अनेक अव्हेंजर्समध्ये सामील होतो. ज्याची ओळख 'इनफर्नल हल्क' द्वारे विद्रूप केली गेली आहे. 'हल्क वॉर' हा चित्रपट 3 फेब्रुवारी 2027 रोजी रिलीज होणार आहे.