पत्नीसोबत गोविंदाचा वाद सुरु असताना कोमल राणीने अभिनेत्यासोबत शेअर केले रोमँटिक फोटो!
गोविंदा, सुनीता अहुजा आणि गोविंदाची रुमर्ड गर्लफ्रेंड कोमल राणी यांच्यामध्ये वाद सुरु असताना अभिनेत्री कोमल राणी हिने सोशल मिडियावर गोविंदासोबतचे काही रोमॅंटिक फोटो शेअर केले आहे.
बॅालिवूडचा स्टार अभिनेता गोविंदा मागिल काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक जीवनामुळे सातत्याने चर्चेत पाहायला मिळाला आहे. गोविंदाचा आगामी सिनेमामधील अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकर यांनी हिच्याशी संबंध असल्याचे गोविंदाच्या पत्नीने मिडीयासमोर गंभीर आरोप केले होते. गोविंदा आणि त्याच्या पत्नीचा वाद हा मिडीयासमोर चर्चेत आणि सार्वजानिक वाद झाला होता. अनेकदा सुनीता अहुजाने गोविंदावर अनेक गंभीर आरोप केले होते. गोविंदा, सुनीता अहुजा आणि गोविंदाची रुमर्ड गर्लफ्रेंड कोमल राणी यांच्यामध्ये वाद सुरु असताना अभिनेत्री कोमल राणी हिने सोशल मिडियावर गोविंदासोबतचे काही रोमॅंटिक फोटो शेअर केले आहे.
कोमल राणीने चित्रपटाच्या सेटवरून गोविंदासोबतचे काही खूप रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाले आहेत. गोविंदा पांढरा ब्लेझर, पांढरा शर्ट आणि काळी पँट घालून 90 च्या दशकातील आपला लूक साकारताना दिसत आहे. तर दुसरीकडे, कोमल राणी सुंदर लॅव्हेंडर आणि जांभळ्या रंगाच्या फुलांच्या साडीत आणि मोत्यांच्या हारावर कमालीची ग्लॅमरस दिसत आहे. फोटोंमध्ये गोविंदा आणि कोमल एकमेकांच्या डोळ्यात हरवून, एकमेकांच्या गळ्यात हात घालून रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना कोमलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "'रूपा'च्या सेटवरील काही सुंदर क्षण."
हे ही वाचा
'मी त्याची एक्स नाही...' अर्शदीपसोबत साखरपुड्यानंतर समरीनचा संताप! पहा पोस्ट
गोविंदाने शेअर केलेल्या या फोटोनंतर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत, गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक जीवनावर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच राखी सावंतची प्रतिक्रिया आली आहे. काही दिवसांपूर्वी, पिंकविलाच्या 'होम टूर' दरम्यान, सुनीताने तिच्या जवळपास 40 वर्षांच्या वैवाहिक जीवनाबद्दल आणि गोविंदासोबतच्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केले होते. त्यांच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना ती म्हणाली, "हे 40 वर्षांचे लग्न आहे, ते का टिकणार नाही? ही केवळ वेळेची बाब आहे. तो त्याचे काम करतोय, मी माझे. या जगात कोणीही मला त्याच्यापासून वेगळे करू शकत नाही."
सुनीताच्या या वक्तव्यातून तिच्या वैवाहिक नात्यावरील तिचा विश्वास स्पष्टपणे दिसून आला. तिने असेही म्हटले की तिने बाकी सर्व काही देवावर सोपवले आहे. सुनीताच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दलची चर्चा अधिकच तीव्र झाली. अनेकांनी तिला पाठिंबा दर्शवला, तर काहींनी गोविंदा आणि कोमल यांच्या कथित जवळीकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.