भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री समरीन कौर यांचा साखरपुडा झाला. सोशल मिडियावर दोघांनीही साखरपुड्याचे फोटो शेअर केले आणि चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. 11 नोव्हेंबर रोजी दोघांचाही साखरपुडा झाला आणि त्यानंतर अर्शदीपने समरीनला हिऱ्याची अंगठी घालून लग्नाची मागणी घातली. फोटो व्हायरल झाल्यानंतर अर्शदीप सिंगची होणारी पत्नी समरीन कौरचे सोशल मिडियावर काही फोटो व्हायरल होत आहे आणि तिचे नाव जोडले जात आहे. काही युझर्सनी समरीनचे तिच्या साखरपुड्याबद्दल अभिनंदन केले, तर काहींनी समरीन आणि यूट्यूबर आशिष चंचलानी यांना जोडणारे रील्स पोस्ट करायला सुरुवात केली.
साखरपुडा झाल्यानंतर आशिष चंचलानी आणि समरीन कौर यांच्या अनेक सोशल मिडियावर व्हिडीओ तयार करण्यात आली आहे. लोकांनी आशिषबद्दल सहानुभूती व्यक्त केली, एका पॉडकास्टवर तो रडत असल्याचे आणि त्याच्या पूर्वीच्या प्रेयसीला शिव्या देत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. समरीन आणि आशिष यांचे प्रेमसंबंध असल्याचा दावा करण्यात आला. आशिष अनेक पॉडकास्टवर दिसला असून, त्याने आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीसोबतचे नाते विषारी असल्याचे म्हटले आहे. तो अनेक प्रसंगी भावूकही झाला आहे. लोकांचा असा विश्वास आहे की, तो समरीनबद्दल बोलत होता. यावर आता अभिनेत्री समरीन कौरने सोशल मिडियावर या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
हे ही वाचा
समरीनने आशिष चंचलानीसोबतच्या संबंधांवर आणि जुन्या क्लिप्सच्या व्हायरल होण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक गूढ पोस्ट शेअर केली आहे. समरीनने स्पष्ट केले की इंटरनेट कधीकधी विचित्र, कधीकधी मजेशीर आणि कधीकधी निराशाजनक असू शकते. ती लिहिते, "आज सकाळी मी उठले आणि पाहिले की चार वर्षांपूर्वी मी ज्या यूट्यूबरसोबत काम केले होते, त्याने माझ्या फोटोचे रील एडिट्स केले होते." मला हे स्पष्ट करायचे आहे की, गेल्या चार वर्षांत आमचे बोलणे झालेले नाही. तसेच, आम्ही एकत्र कोणतीही सामग्री तयार केलेली नाही. कृपया केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी चार वर्षे जुने फोटो आणि क्लिप्स प्रसारित करणे थांबवा.
Samreen Kaur has finally addressed the viral edits connecting her with Ashish Chanchlani after her engagement to cricketer Arshdeep Singh. In her Instagram Story, she called out content creators for using old pictures and videos to spread misleading narratives and create unnecessary speculation.
— MR. SP (@Lonely_Prabhhh) November 13, 2026
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या पॉडकास्टमध्ये उल्लेख असलेली मुलगी मी नाही. मी हे अनेकदा सांगितले आहे. तरीही माझे नाव अजूनही यात ओढले जात आहे. माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल खोटा आरोप लावणे हे त्यांचा अपमान करण्यासारखेच आहे. जे निर्माते क्लिकबेटसाठी माझे नाव आणि फोटो वापरत आहेत, त्यांच्यावर माझी टीम कायदेशीर कारवाई करेल. त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, सर्वच कंटेंट केवळ क्लिक्स आणि व्ह्यूजसाठी नसतो. त्यात कोणाच्या तरी कुटुंबाचा आणि प्रतिष्ठेचाही प्रश्न असतो.