बॅालिवूडचा अभिनेता आमिर खानने तिसरे लग्न केल्यानंतर सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात त्याच्यावर टीका करण्यात आली होती. आता एका अभिनेत्रीने तिसऱ्यांदा लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान सिनेमासृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री किरण खान यांनी तिसऱ्यांदा लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले असून अनेक मॉर्निंग शोचे सूत्रसंचालनही केले आहे. मात्र, तिच्या व्यावसायिक जीवनासोबतच तिचे वैयक्तिक आयुष्यही नेहमी चर्चेत असते. अभिनेत्रीने एका शोमध्ये यासंदर्भात भाष्य केले आहे, नक्की काय म्हणाली अभिनेत्री यासंदर्भात सविस्तर वाचा.
अभिनेत्री किरण खान हिने आता तिसरे लग्न हे वयाच्या 51 व्या वर्षी केले आहे, मागील काही दिवसांपासून तिच्या लग्नाची खूप चर्चा पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध पाकिस्तानी उद्योगपती मिर्झा इश्तियाक बेग यांच्याशी विवाह करून नवीन आयुष्याला सुरुवात केली. या जोडप्याने मक्का येथे साध्या पद्धतीने लग्न केले आणि त्यानंतर एकत्र उमराह केली. अभिनेत्री किरण खान हिने सूत्रसंचालिका निदा यासिरच्या शोमध्ये गेस्ट म्हणून आली होती यामध्ये तिने लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. या शोमध्ये अभिनेत्रीने लग्नाला गरजेपेक्षा जास्तच रोमँटिक बनवणाऱ्या महिलांच्या मानसिकतेवर चर्चा केली.
हे ही वाचा
तिच्या तिसऱ्या लग्नानंतर, किरण खान पाकिस्तानी अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका निदा यासिरच्या शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती. त्या शोमध्ये तिने, लग्नाला गरजेपेक्षा जास्तच रोमँटिक बनवणाऱ्या महिलांच्या मानसिकतेवर चर्चा केली. किरण खान लग्नाबद्दल म्हणाल्या, "मला वाटतं, लग्नाबद्दल एक सामान्य गैरसमज असा आहे की तो फक्त एक मधुचंद्राचा काळ असतो, ज्यात सर्व काही चांगलं आणि प्रेमाने भरलेलं असतं. लहान वयात लग्न करताना माझ्या मनात हेच होतं." या विचारसरणीमुळे लोकांना अनेकदा असे वाटते की त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही. पण वास्तविक पाहता, लग्नानंतरचा मधुचंद्राचा काळ हा जुळवून घेण्याचा असतो, कारण वेगवेगळ्या विचारसरणीचे दोन लोक एकत्र राहू लागतात.
अभिनेत्रीने सोशल मिडियावर लग्न केल्यानंतर काही फोटो शेअर केले होते. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे त्यांचे तिसरे लग्न आहे. त्यांच्या पहिल्या पतीचे नाव उघड करण्यात आलेले नाही. त्यांना पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे. त्यांच्या घटस्फोटानंतर, किरण खान यांनी 2013 मध्ये निवृत्त पाकिस्तानी मेजर नझीर अली यांच्याशी लग्न केले. मात्र, काही वर्षांनंतर हे लग्नही संपुष्टात आले.