SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

33 किलोचे कपडे, 1.8 किलोचं मुकुट, 'रामायण' चित्रपटात रावण बनण्यासाठी यशला काय काय करावं लागलं?

Ramayana Movie Ravan Costumes : रामायण या भव्य चित्रपटात रावणाची भूमिका सरकरा अभिनेता यश याने रावणाची वेशभूषा परिधान करण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्याचा कॉस्ट्यूम हा जवळपास 33 किलोचा असल्याचं समोर येत आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 10, 2026, 12:43 IST | Updated: Nov 10, 2026, 13:22 IST
Image Credit: 33 किलोचे कपडे, 1.8 किलोचं मुकुट, 'रामायण' चित्रपटात रावण बनण्यासाठी यशला काय काय करावं लागलं?
Join

Ramayana Movie Ravan Costumes : नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये हाउसफुल प्रतिसादात सुरु आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाची भव्यता प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडत आहे. या चित्रपटात रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर याला जेवढी पसंती दिली जातेय, तेवढीच पसंती ही रावणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता यशला सुद्धा दिली जातेय. मात्र रावणाची भूमिका अतिशय प्रभावीपणे निभावणाऱ्या यशने हुबेहूब रावणासारखे दिसण्यासाठी जवळपास 33 किलोचे कपडे आणि 1.8 किलोचं  मुकुट परिधान केलं होतं. सध्या अभिनेता यशने घातलेल्या रावणाच्या कपड्यांची बरीच चर्चा आहे.

रावण दिसण्यासाठी काय काय केलं?

सानियाने एका मीडियाला मुलाखत देताना म्हटलं की, यशचे अधिकतर कॉस्ट्यूम (कपडे) चे वजन हे दागिन्यांसहित जवळपास 16 ते 20 किलो इतके होते. तर काही कॉस्ट्यूम हे खूपच भारी होते. यात लंकेच्या रावणाचा लूक, त्याच्या लग्नातील पोशाख आणि शूर्पणखेच्या लग्नासाठी वापरलेला पोशाख यांचा समावेश होता. सानियाच्या म्हणण्यानुसार, यांचे वजन सुमारे 30 ते 33 किलो इतके होते.

1.8 किलोचं मुकुट :

सानियाने म्हटले की, 'यात सगळ्यात कठीण काम हे मुकुट घालण्याचं होतं. कारण डोक्यावरच थोडंसं वजन सुद्धा खूप भारी असल्या सारखं वाटतं. या मुकुटाचे वजन कमी करण्याचा बऱ्याचदा प्रयत्न करण्यात आला, यासाठी 3D मुकुटचे अनेक मॉडेल सुद्धा तयार करण्यात आले. सुरुवातीला आम्ही डिझाइन तयार केले आणि त्यानंतर त्याचे वजन कमी करण्यावर काम केले. मात्र मला वाटत नाही की आम्ही त्याचे वजन 1.8 किलोच्या खाली आणू शकलो. ती एक प्रकारे किमान मर्यादा होती, तरीही ते खूप जड होते. यशच्या चेहऱ्यावर कोणतीही अस्वस्थता दिसून येत नव्हती, पण प्रत्यक्षात ते परिधान करणे त्याच्यासाठी अत्यंत कठीण होते.

सानियाने सांगितलं की वजनदार कॉस्ट्यूम असल्याने अभिनेता यशला चालायला फिरायला खूप त्रास व्हायचा. मात्र एवढा वेळ तो भारी कॉस्ट्यूम घालून सुद्धा यश हा सेटवर मजा मस्ती करत राहायचा.  

रामायण चित्रपटात कोण कोण?

रामायण चित्रपटात रणबीर कपूर हा श्री राम, साई पल्लवीने माता सीता, अभिनेता यशने रावण तर रवी दुबेने लक्ष्मण अशी भूमिका साकारली आहे. नमित मल्होत्रा यांनी हा चित्रपट प्रदर्शित केला असून याचा पहिला भाग हा ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यतात येणार तर दुसरा पार्ट हा  2028 मध्ये खेळवला जाईल. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES