SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'इथे आमच्या घरावर गोळ्या झाडल्या जातायंत...' रोहित शेट्टीने गोळीबाराच्या घटनेवर सोडलं मौन, गँगस्टर कल्‍चरबाबत स्पष्टच म्हणाला

प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने 10 महिन्यांनी त्याच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत मौन सोडलं आहे. त्याने रिऍलिटी शोवर याबाबत भाष्य केलं असून सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतंय. रोहित शेट्टीने त्याच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत यापूर्वी सार्वजनिकरित्या भाष्य केलं नव्हतं.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 25, 2026, 04:26 PM IST | Updated: Oct 25, 2026, 05:08 PM IST
Image Credit: 'इथे आमच्या घरावर गोळ्या झाडल्या जातायंत...' रोहित शेट्टीने गोळीबाराच्या घटनेवर सोडलं मौन, गँगस्टर कल्‍चरबाबत स्पष्टच म्हणाला
Join

Rohit Shetty : बॉलिवूडमधील सेलिब्रिटीना मागच्या काही काळात जीवानिशी मारण्याची धमकी मिळत आहे. नुकतंच बॉलिवूड अभिनेता असलेल्या टायगर श्रॉफवर कारवर गोळीबार करण्यात आला. त्यापूर्वी सलमान खान आणि रोहित शेट्टीच्या घरांवर सुद्धा गोळीबार करण्यात आलेला. यासगळ्या हल्ल्यांच्या मागे कथित रूपात लॉरेंस बिश्‍नोई गॅंगचा हात असल्याचं समोर आलं. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक असलेल्या रोहित शेट्टीने 10 महिन्यांनी त्याच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत मौन सोडलं आहे. रोहित शेट्टी शनिवारी 'बिग बॉस 20' मध्ये विकेंडचा वार हा एपिसोड होस्ट करत होते. या दरम्यान स्पर्धकांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या मनातील गोष्ट अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानी गोळीबाराची एक घटना घडली.

रोहित शेट्टीने बिग बॉस 20 मध्ये सलमान खानच्या अनुपस्थितीत एक एपिसोड शूट केला. त्यांनी त्यातील स्पर्धकांना गँगस्टर सारखी प्रतिमा तयार करण्याबाबत फटकारले. त्यानेस्पर्धकांच्या वागणुकीवर आपली नाराजी व्यक्त केली. त्याने म्हटले की हे तिघे वारंवार 'काझी तौकीर' यांना लक्ष्य करत आहेत. या संदर्भात रोहितने बॉलिवूडमधील व्यक्तींशी संबंधित गोळीबाराच्या विविध घटनांचा उल्लेख करत म्हटले 'येथे आमच्या घरांवर गोळ्या झाडल्या जात आहेत आणि तुम्ही लोक गँगस्टरसारखे वागत फिरत आहात?'

रोहित शेट्टीच्या घरी सुद्धा झालेली फायरिंग :

1 फेब्रुवारी रोजी, मुंबईत रोहित शेट्टी ज्या निवासी इमारतीत राहतात, तिथे गोळीबाराची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास इमारतीच्या पहिल्या मजल्यावर किमान पाच राऊंड गोळीबार करण्यात आला. यात कोणताही व्यक्ती दुखापतग्रस्त झाला नाही, मात्र या घटनेने बॉलिवूडमध्ये घाबराटीचं वातावरण पसरलं होतं. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अनेक आरोपींना अटक केली. या घटनेनंतर रोहित शेट्टीच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले गेले होते. मात्र विषयावर या रोहित शेट्टीने सार्वजनिकरीत्या भाष्य केले नव्हते.

हेही वाचा : जीवघेणा हल्ल्यातून थोडक्यात बचावल्यानंतर टायगर श्रॉफचा मोठा निर्णय! आलिशान घरं विकलं, कितीला झाली डील?

टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार :

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर 18 ऑक्टोबर रोजी गोळीबार करण्यात आला. संध्याकाळी 7 वाजता जुहू येथील एका विभागात ही घटना घडली. टायफार श्रॉफ हा फुटबॉल क्लबमधून बाहेर जात असताना त्याच्या कारवर गोळीबार करण्यात आला. या घटनेत अभिनेत्याच्या ड्रायव्हरला गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला. आता टायगर श्रॉफला गंभीर दुखापत झाली नसली तरी या घटनेमुळे पुन्हा बॉलिवूड हादरलं. सध्या या प्रकरणाची तपासणी सुरु आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES