• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /Let's Solve This S**t, Bro! सलमान खानच्या 'मातृभूमी' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर अखेर रिलीज!

Let's Solve This S**t, Bro! सलमान खानच्या 'मातृभूमी' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर अखेर रिलीज!

सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'मातृभूमी' चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खान पहिल्यांदाच लष्कर जवानाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 11, 2026, 07:11 IST|Updated: Nov 11, 2026, 07:18 IST
joinshare
Let's Solve This S**t, Bro! सलमान खानच्या 'मातृभूमी' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर अखेर रिलीज!
Image Credit: सलमान खानच्या 'मातृभूमी' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर अखेर रिलीज!

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या आगामी 'मातृभूमी' (Matrubhumi)  चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतानाच अखेर ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या ट्रेलरला नुकतीच मंजुरी मिळाली.  यानंतर 10 नोव्हेंबरला तो अधिकृतपणे प्रदर्शित करण्यात आला आहे. युद्धावर आधारित या चित्रपटाची पहिली झलक अत्यंत प्रभावी आहे. 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' (Matrubhumi: May War Rest in Peace) हा चित्रपट देशभक्ती, त्याग आणि युद्धामुळे मानवी जीवनावर होणारे परिणाम यावर भाष्य करतो.

'मातृभूमी'चा ट्रेलर प्रदर्शित

'मातृभूमी'च्या निर्मात्यांनी अखेर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. यात लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत सलमान खान प्रभावी दिसत आहे. संपूर्ण ट्रेलरमध्ये देशभक्तीची भावना दिसून येते. ट्रेलरमध्ये ॲक्शन सीक्वेन्स, अंगावर शहारे आणणारी लढाई आणि काही जबरदस्त सीन्सचा समावेश आहे. चित्रपटाच्या माध्यमातून युद्धामुळे कोणाचेही भले होत नाही असा संदेश दिला जात असल्याचंही दिसत आहे. धाडस फक्त युद्ध करण्यात नाही तर ते रोखण्यातही आहे असं यात सलमान सांगताना दिसत आहे.

ट्रेलर पाहिल्यानंतर, चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सलमान खानला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 'मातृभूमी' 4 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

Aaj release karoon ya kal ? Jo kal kare so aaj kar, Jo aaj kare so ab.Enjoy the trailer….. #MaatrubhumiTrailer out now @IChitrangda @LakhiaApoorva #ZeynShaw #AbhishrriSen @JasonThamIndia @TheAnkurBhatia #HarshilShah #HeeraSohal #VipinBhardwaj @TanyaDesai4 #HimeshReshammiya @meetbros @SKFilmsOfficial @SKF_Music @RaviBasrur @cchintanshaah @ShamiraahN @editormayuresh

— Salman Khan (@BeingSalmanKhan) November 10, 2026

 

'मातृभूमी'ला कोणते प्रमाणपत्र मिळाले आहे?

'व्हरायटी इंडिया' (Variety India) नुसार, 'मातृभूमी'च्या ट्रेलरला 'यू/ए' (U/A) प्रमाणपत्र मिळाले आहे.

'मातृभूमी'समोर अडचणी

अपूर्व लाखिया दिग्दर्शित या चित्रपटाचे सुरुवातीचे शीर्षक 'बॅटल ऑफ गलवान' (Battle of Galwan) असे होते. हा चित्रपट गलवान खोऱ्यात 2020 मध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर आधारित आहे. हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. चित्रपटाचा विषय आणि चीनच्या उल्लेखांमुळे त्यांना विविध अडथळ्यांचा सामना करावा लागला. विशेषतः, दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांत होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर या अडचणी निर्माण झाल्या होत्या.


सलमान खानच्या 'मातृभूमी' (Matrubhumi) चित्रपटाबद्दल

चित्रपटात सलमान खान कर्नल बिक्कुमाला संतोष बाबू यांची भूमिका साकारत आहेत. '16 बिहार रेजिमेंट'चे कमांडिंग ऑफिसर म्हणून, त्यांनी 2020 मधील गलवान खोऱ्यातील संघर्षादरम्यान भारतीय सैनिकांचे नेतृत्व केले होते. त्यांना मरणोत्तर 'महावीर चक्र' देऊन सन्मानित करण्यात आले होते. चित्रपटाची संपूर्ण कथा त्यांच्या पात्राभोवती फिरते.

या चित्रपटात मुकेश ऋषी, अंकुर भाटिया, जेन शॉ आणि अभिलाष चौधरी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत असून, त्यांनी सीमेवरील मोहिमांमध्ये सहभागी असलेले लष्करी अधिकारी आणि इतर प्रमुख व्यक्तींच्या भूमिका साकारल्या आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Salman Khan
Entertainment News