SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

टायगर श्रॉफवर फुटबॉल मैदानातच हल्ला करणार होते पण...; तपासात मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. अभिनेत्यावर फुटबॉलच्या मैदानातच हल्ला होणार होता.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 29, 2026, 08:22 AM IST | Updated: Oct 29, 2026, 12:45 PM IST
Image Credit: Tiger Shroff Crime Branch
Join

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात मोठा आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक केली आहे. चौकशी दरम्यान या हल्लेखोरांनी धक्कादायक माहिती दिली आहे. तपासात असंही समोर आलं आहे की, टायगर श्रॉफवर हल्ल्या करण्यापूर्वी आमिर खान हा हल्लेखोऱ्यांच्या टार्गेट होतं. या हल्लेखोऱ्यांनी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या घरांची रेकी केली होती. महत्त्वाचे म्हणजे बॉलिवूडमधील सिरियल किसर इम्रान हाश्मीचं घर हल्लेखोरांना सापडलं नाही, म्हणून तो त्यांच्या टार्गेटमधून वाचला. पण टायगर श्रॉफला लक्ष्य करणे हल्लेखोऱ्यांना सोपे झालं होतं, कारण तो सोशल मीडियावर त्याची माहिती मिळत होती. 

मुख्य शूटर फूल सिंह आणि रेहान यांनी चौकशीदरम्यान असा दावा केला की, त्यांना टायगर श्रॉफची हत्या करण्याचा कोणताही हेतू नव्हता. तर त्यांना बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करायची होती. मुंबई गुन्हे शाखेमधील सूत्रांनी सांगितलं की, हल्लेखोर चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक दावे करत आहेत. 

हेसुद्धा वाचा  - बॉलिवूडचा 'सिरीअल किसर'ही होता टायगरच्या हल्लेखोरांच्या टार्गेटवर; पण... 

हल्लेखोऱ्यांनी चौकशीदरम्यान असाही दावा केली की,  जुहूमधील पुष्पा नरसी पार्क टायगर श्रॉफ फुटबॉलचा सामना खेळत होता.  त्यावेळी शूटर त्याच्या अगदी जवळ होता आणि शिवाय टायगर श्रॉफसोबत त्यावेळी सुरक्षा रक्षक किंवा बाउन्सर नव्हता. त्यामुळे त्यावेळी टायगर श्रॉफला मारणे सोपे होते. 

पुढे आरोपींना असाही दावा केला की, टायगर श्रॉफची हत्याच करायची असती तर त्याला फुटबॉल खेळत असतानाच मारे अगदी सोपे होते. पण त्यांना टायगर श्रॉफची हत्या करायची नव्हती. तर त्यांना बॉलिवूडमध्ये दहशत पसरावयची होती. बॉलिवूडमधील कलाकारांना भीती दाखवण्यासाठी टायगर श्रॉफवर फायरिंग करण्यात आली होती. 

हेसुद्धा वाचा - मीनाक्षी - राजेंद्र शिंदेंची चौकशी, सीसीटीव्ही फुटेज...; अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणाले, 'पुराव्याची सांगड घालून...' प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचकडून शूटर फूल सिंह आणि रेहान यांची सतत सखोल चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीदरम्यान त्यांनी केलेल्या दाव्यामुळे या तपासाला दिशा मिळत असून त्यांच्या दाव्यात किती दम आहे, हे तपासले जात आहे. या हल्ल्यामागील मास्टरमाइंड कोण आहे, याचा तपास गुन्हे शाखेकडून युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES