Tiger Shroff Car Firing : रविवार 18 ऑक्टोबर रोजी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या आलिशान BMW कारवर गोळीबार करण्यात आला. तीन अनोळखी लोकांनी त्याच्या कारवर गोळीबार केला, यावेळी टायगर कारमध्येच बसला होता. या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की टायगर श्रॉफला या गोळीबारात गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेनंतर अनेकांना हा प्रश्न पडला की अखेर ज्या कारमध्ये टायगर श्रॉफ प्रवास करत होता ती किती सुरक्षित होती. तसेच अशा कारची किंमत किती आहे? अनेक वर्षांपासून, BMW आपल्या वाहनांच्या सुरक्षिततेवर आणि संरचनेच्या मजबुतीवर विशेष भर दिला आहे. मात्र, कोणतीही कार गोळीबारापासून किंवा बॉम्बस्फोटांपासून पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी, तिला विशेष अशा अतिरिक्त 'बुलेटप्रूफिंग'ची गरज असते. तेव्हा या टायगर श्रॉफच्या BMW गाडीबाबत जाणून घेऊयात.
BMW गाड्या किती सुरक्षित असतात?
BMW गाड्या किती मजबूत असतात याबाबत बोलायचं झालं तर बीएमडब्ल्यूच्या आलिशान गाड्या त्यांच्या अतुलनीय सुरक्षा प्रणाली आणि उत्कृष्ट बांधणीच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या रचनेत उच्च-शक्तीचे स्टील, ॲल्युमिनियम आणि मजबूत संमिश्र सामग्रीचा वापर केला जातो. ज्यामुळे अपघात किंवा धडक झाल्यास गाडीतील प्रवासी बऱ्यापैकी अधिक सुरक्षित राहतात.
याशिवाय BMW गाड्यांमध्ये प्रगत एअरबॅग्ज, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, क्रॅश सेन्सर्स आणि स्टेबिलिटी कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये असतात. तसेच थेट गोळीबारापासून संरक्षणासाठी वाहनावर विशेष आर्मर बसवणे आवश्यक ठरते.
बुलेटप्रूफ कार बनवण्यासाठी काय करावं लागतं?
एखादी कार बुलेटप्रूफ म्हणेजच गोळीरोधक बनवली जाते, तेव्हा त्यात विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सर्वात आधी वाहनाच्या मूळ खिडक्यांच्या जागी बहुस्तरीय बॅलिस्टिक ग्लास बसवली जाते, जी येणाऱ्या गोळ्यांचा आघात आणि वेग प्रभावीपणे निष्प्रभ करते. याशिवाय गाडीच्या बॉडी पॅनेल, दरवाजे, छप्पर आणि तळाच्या भागात केव्ह्लार, अरामिड फायबर आणि उच्च दर्जाच्या बॅलिस्टिक स्टीलचे भक्कम थर बसवण्यात येतात. तसेच या वाहनात रन-फ्लॅट टायर बसवले जातात.
कार बुलेटप्रूफ करण्यासाठी किती खर्च येतोन :
जर तुम्हाला एखादे वाहन 'बुलेटप्रूफ' करण्यासाठी त्यात मॉडिफिकेशन करायचे असेल तर त्यासाठी येणारा खर्च आवश्यक असलेल्या संरक्षणाच्या पातळीवर अवलंबून असेल. भारतात प्राथमिक स्तरावरील कारच्या बुलेटप्रूफिंगसाठी साधारणपणे 25 लाख ते 40 लाख रुपयांपासून खर्च सुरू होतो. या स्तरावरील संरक्षणाद्वारे लहान आग्नेयास्त्रे आणि पिस्तूलच्या गोळ्यांपासून बचाव होऊ शकतो. दुसरीकडे जर तुम्हाला कारसाठी उच्चस्तरीय संरक्षणाची आवश्यकता असेल. तर त्यासाठी 50 लाख ते 1 कोटी इतका खर्च येतो या सुरक्षेनंतर AK-47 सारख्या असॉल्ट रायफल्स किंवा ग्रेनेड स्फोटांपासून सुद्धा तुमची कार वाचू शकते.