• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /'तुम्हाला साधं बोलायला जमेना, गाणं काय गाणार?', दलेर मेहंदीवर संतापले कॅबिनेट मंत्री; थेट स्टेजवर जाऊन सुनावलं, VIDEO व्हायरल

'तुम्हाला साधं बोलायला जमेना, गाणं काय गाणार?', दलेर मेहंदीवर संतापले कॅबिनेट मंत्री; थेट स्टेजवर जाऊन सुनावलं, VIDEO व्हायरल

एका कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पंजाबी गायक दलेर मेहंदी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्यांची स्थिती पाहून कॅबिनेट मंत्री त्यांच्यावर संतापले आणि मंचावर जाऊन खडेबोल सुनावले.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 19, 2026, 06:42 PM IST|Updated: Oct 19, 2026, 06:47 PM IST
joinshare
'तुम्हाला साधं बोलायला जमेना, गाणं काय गाणार?', दलेर मेहंदीवर संतापले कॅबिनेट मंत्री; थेट स्टेजवर जाऊन सुनावलं, VIDEO व्हायरल
Image Credit: दलेर मेहंदीवर संतापले कॅबिनेट मंत्री

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

उत्तराखंडमधील टिहरी येथील नरेंद्र नगरमध्ये सुरू असलेल्या 50 व्या 'कुंजापुरी पर्यटन आणि विकास मेळाव्या'त काहीसा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ  पंजाबी गायक दलेर मेहंदी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्यांची स्थिती पाहून कॅबिनेट मंत्री त्यांच्यावर संतापले आणि मंचावर जाऊन खडेबोल सुनावले. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान दलेर मेहंदी नशेत असताना सादरीकरण करण्यासाठी मंचावर आले होते असा दावा सोशल मीडियावर काही युजर्स करत आहेत.

लाइव्ह परफॉर्मन्ससाठी पोहोचले होते दलेर मेहंदी

18 ऑक्टोबरच्या रात्री पंजाबी गायक दलेर मेहंदी जत्रेतील सांस्कृतिक कार्यक्रमात सादरीकरण करण्यासाठी पोहोचले होते. मंचावर रोषणाई केली जात असताना आणि त्यांचे सादरीकरण सुरू होणार असतानाच, कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल अचानक मंचावर आले, त्यांनी माईक हातात घेतला आणि दलेर मेहंदी यांना सुनावण्यास सुरुवात केली. "जर तुम्हाला नीट बोलताही येत नसेल, तर तुम्ही गाणार कसे? हा कुंजापुरी मेळा आहे, काही खाजगी कार्यक्रम नाही," असे ते बोलत असल्याचे व्हिडीओत ऐकू येत आहे.

व्हिडीओत नेमके काय?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल दलेर मेहंदी यांना सर्वांसमोर सुनावताना दिसत आहेत. "तुम्हाला इथे आणण्यासाठी आम्ही मोठी रक्कम दिली आहे. तुम्ही नशेत आहात आणि लोकांची फसवणूक करत आहात. तुम्ही गाण्यासाठी मिक्सरचा वापर करत आहेत, हे चुकीचे आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रतिष्ठेचा आदर राखायला हवा. तुम्ही एक मोठे व्यक्ती असल्यानेच आम्ही तुम्हाला आमंत्रित केले होते. तुम्ही नीट बोलूही शकत नाही, गाण्याचा तर प्रश्नच येत नाही. हे अजिबात योग्य नाही," अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

 

दिलेर मेहंदी पर फूटा कैबिनेट मंत्री सुबोध उनियाल का गुस्सा उत्तराखंड में एक कार्यक्रम के दौरान मशहूर पंजाबी सिंगर दिलेर मेहंदी को भजन गाने के लिए बुलाया गया था। जहां मौजूद मंत्री सुबोध उनियाल ने कहा, बोल तो पा नहीं रहे गाना क्या गाओगे! आखिर क्यों नहीं बोल पा रहे थे दिलेर मेहंदी?

— Bhupi Panwar (@askbhupi) October 19, 2026

 

"तुम्हाला नीट बोलताही येत नाही, मग तुम्ही गाणार कसे?", अशा शब्दांत त्यांनी सुनावले. यादरम्यान दलेर मेहंदी शांत उभे होते आणि मधे मधे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी आयोजकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, काही नेटकरी दलेर मेहंदी नशेत होते असा दावा करत आहेत. नशेत असल्याने त्यांना नीट बोलताही येत नव्हते, यामुळे कॅबिनेट मंत्री संतापले असा दावा ते करत आहेत. मात्र, या घटनेबाबत मंत्री किंवा गायक यांच्यापैकी कोणाकडूनही कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.

प्रेक्षकांच्या नाराजीमुळे कॅबिनेट मंत्री मंचावर चढले

दरम्यान, दलेर मेहंदी यांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी सांगितले की, त्यांनी एक-दोन गाणी गायली आणि नंतर प्री-रेकॉर्डेड ट्रॅक वाजू लागला, ज्यामध्ये दुसऱ्या कोणाचा तरी आवाज होता. आपली फसवणूक झाल्याचे जाणवताच, प्रेक्षकांनी निषेध नोंदवत आरडाओरडा सुरू केला. स्थानिकांची ही नाराजी पाहून संतप्त झालेले कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल स्वतःला रोखू शकले नाहीत आणि थेट मंचावर चढले आणि सुनावले. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Viral News
Entertainment News