मोठी दुर्घटना! 180 प्रवाशांसह 5 मजली क्रूझ जहाज पाण्यात बुडाले; टँकरची जहाजाला धडक
टँकरच्या धडकेने पाच मजली क्रूझ जहाज पाण्यात बुडाले आहे. या जहाजात 180 प्रवासी होते. अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स येथे ही दुर्घटना घडली आहे.
न्यू ऑर्लिन्स: अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स येथे मोठी दुर्घटना घडली आहे. 180 प्रवाशांसह 5 मजली क्रूझ जहाज पाण्यात बुडाले आहे. एका टँकरने या जहाजाला धडक दिली यामुळे जहाजात पणी शिरले आणि ते बुडू लागले. सुदैवाने या जहाजवरील सर्व 180 जण सुखरुप बचावले आहेत.
मिसिसिपी नदी किनाऱ्यावर ही घटना घडली आहे. न्यू ऑर्लीन्स येथे घाटाला लागून उभ्या असलेल्या एका क्रूझ जहाजाला एका टँकरने जोरात धडक दिली. या अपघातानंतर जहाज एका बाजूला कलून पाण्यात बुडाले. मात्र त्यावरील सुमारे 180 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या घटनेत किमान 32 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुदैवाने, सर्व प्रवासी सुरक्षित असून या दुर्घटनेत कोणीही बेपत्ता नाही.'अमेरिकन हेरिटेज' नावाच्या या क्रूझ जहाजाला 'अटलांटिक आस्फाल्ट' या मालवाहू जहाजाने धडक दिली. या धडकेमुळे पाच मजली क्रूझ जहाज एका बाजूला वाकले आणि नदीत अंशतः बुडाले, ज्यामुळे तात्काळ एक मोठी बचाव मोहीम राबवण्यात आली.
दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल
या दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अटलांटिक अस्फाल्ट नावाच्या एका टँकरने धक्क्याला लागलेल्या अमेरिकन हेरिटेज क्रूझ बोटीला धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेचे व्हिडिओ काढले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये मोठा टँकर थेट क्रूझ जहाजाला धडकताना दिसत आहे. या धडकेनंतर जहाजाचे तुकडे झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. धडक बसल्यानंतर काही मिनिटांतच क्रूझ बोट एका बाजूला कलू लागली. जहाज पाणी शिरले आणि जहाज बुडाले. यादुर्घटनेचे वृत्त समजताच बचाव पथक तताडीने घटनास्थळी दाखल झाले. आसपास उभी असलेली अनेक लहान मोठी जहाजे देखील मदतीसाठी धावून आली. यामुळे अपघातग्रस्त जहाजावरील क्रू मेंबरसह 180 जणांना वाचवण्यात यश आले आहे. सर्वजण सुखरुप बचावल्याचे न्यू ऑर्लिन्सच्या महापौर हेलेना मोरेनो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.