86 वाहनांची एकमेकांना धडक; अत्यंत भयानक अपघात, 12 जणांचा मृत्यू, 50 पेक्षा जास्त जखमी, राष्ट्रपतींनी तात्काळ घेतला मोठा निर्णय
86 वाहनांची एकमेकांना धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर,50 पेक्षा जास्त लोक जखमी असल्याचे वृत्त आहे.
Bulgaria : बल्गेरियामध्ये अत्यंत भयानक अपघात झाला आहे. महामार्गावर 86 वाहनांची एकमेकांना धडक झाली. या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 50 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दाट धुक्यामुळे हा विचित्र अपघात झाल्याचेसांगितले जात आहे. बल्गेरियाच्या राष्ट्राध्यक्ष इलियाना योटोवा तात्काळ देशात दाखल झाले.
बल्गेरियाची राजधानी सोफियाला काळ्या समुद्रावरील बंदर शहर बर्गासशी जोडणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला. 86 वाहनांची टक्कर झाली. यात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 50 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला.
अपघात नेमका कसा झाला?
दाट धुक्यामुळे महामार्गावर दृष्यमानता कमी झाली. पहिला अपघात महामार्गाच्या पूर्वेकडील लेनवर झाला. दाट धुक्यामुळे चालकांना पुढील वाहने दिसली नाहीत. यामुळे अनेक वाहने एकमेकांवर आदळली. पहिल्या अपघातानंतर लगेचच, राजधानी सोफियाकडे जाणाऱ्या महामार्गाच्या दुसऱ्या लेनवर वाहनांची टक्कर झाली. येथेही धुक्यामुळे चालकांना पुढचे स्पष्टपणे न दिसल्याने वाहनांची टक्कर झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अपघात पाहताना काही चालकांचे रस्त्यावरून लक्ष विचलित झाले. यामुळे ही वाहने देखील अपघातग्रस्त झाली.
वाहनांच्या अति वेगामुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे. महामार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. घटनास्थळी बचाव पथके दाखल झाली. नुकसानग्रस्त वाहने आणि ढिगारा बाजूला हटवण्याचे काम सुरु आहे. हे सर्व हटवल्यानंतरच महामार्ग पुन्हा सुरू केला जाईल.
वाहने कापून लोकांना बाहेर काढले
वाहनांची एकमेकांना धडक झाल्याने हा विचित्र अपघात झाला. यामुळे अनेक जण अपघातग्रस्त वाहनांमध्ये अकडले होतो. तर, अनेक जण डिव्हायर तसेच रसत्याच्या कडेला असलेल्या रेलिंग मध्ये अडकले होते.वाहने तसेच रेलिंग कापून अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यात आले. यांबोल प्रदेशाचे गव्हर्नर जॉर्जी चकालोव्ह यांनी बचाव कार्याची माहिती दिली. दाट धुक्यामुळे जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टर बोलावता आले नाहीत. अपघातादरम्यान एका वाहनाला आग लागली. यात अडकेल्यांनी सुखरुप सुटका करण्यात आली.
अपघाताचे वृत्त समजताच बल्गेरियाचे राष्ट्राध्यक्ष इलियाना योटोवा आपला परदेश दौरा अर्धवट सोडून देशात परत येण्याचा निर्णय घेतला. पॅरिस पीस फोरममध्ये सहभागी होण्यासाठी पॅरिसला गेल्या होत्या, परंतु अपघाताची बातमी मिळाल्यानंतर त्यांनी कार्यक्रम सोडून बल्गेरियाला परतण्याचा निर्णय घेतला.