Microsoft News : जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेयर कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टची ईमेल सर्विस गुरुवारी मध्यरात्रीपासून अचानक ठप्प पडल्याने जगभरातील याच्या कोट्यवधी यूजर्सना फटका बसला आहे. सर्वर ठप्प झालेल्याला 10 तासांच्या वरती वेळ झाला असून अद्याप ईमेल सर्विस पुर्वव्रत झालेली नाही. यामुळे अनेक दिग्गज कंपन्यांचं कामकाज प्रभावित झालं आहे. आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 सर्व्हरमध्ये अचानक आलेल्या बिघाडामुळे भारतसह जगभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोक त्यांचा मेलबॉक्स ओपन करू शकत नसल्याने अनेक महत्त्वाचे ईमेल न वाचलेल्या स्थितीत इनबॉक्समध्ये पडून आहेत. याव्यतिरिक्त, यूजर्स नवीन ईमेल पाठवूही शकत नाहीत. थोडक्यात सांगायचे तर, यूजर्स त्यांच्या खात्यात लॉग इन करू शकत नाहीत, तसेच ते संदेश पाठवू किंवा प्राप्तही करू शकत नाहीत.
मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर डाऊन :
मायक्रोसॉफ्टचं म्हणणं आहे की काही टेक्निकल कारणांमुळे अनेक क्षेत्रांमधील कनेक्टिविटी प्रभावित झाली आहे. कंपनी याला लवकरच ठीक करण्याच्या मागे लागली असून कंपनी ही समस्या त्वरित सोडवण्यासाठी काम करत आहे. मायक्रोसॉफ्ट 365 ने त्यांच्या 'एक्स' हँडलवर एक निवेदन जारी केले आहे. नमूद केले आहे की त्यांच्या ईमेल सेवेतील तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील लाखो कार्यालयांमधील कामकाज ठप्प झाले आहे.
We're investigating reports of users experiencing issues accessing Exchange Online mailboxes through multiple connection methods in the Americas. More details can be found in the Microsoft 365 admin center under EX1550543.
Microsoft 365 Status (MSFT365Status) November 12, 2026
आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 नाही उघडत :
कंपनीने पुढे म्हटलं की डाउनडिटेक्टरच्या सांगण्यानुसार, आउटलुकमधील समस्यांची सुरुवात ईस्टर्न टाइमनुसार दुपारी 1 च्या सुमारास झाली. तक्रारींच्या संख्येत वेगाने वाढ झाली असून, आतापर्यंत आउटलुक बाबत 1 लाखाहून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. याव्यतिरिक्त हजारो वापरकर्त्यांनी मायक्रोसॉफ्ट 365 वापरतानाही अडचणी येत असल्याचे कळवले आहे. कंपनीची तांत्रिक टीम सध्या याची चौकशी करत असून, समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे.