कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चिप्सची निर्मिती करणारी जागतिक आघाडीची कंपनी 'एनव्हिडिया' (Nvidia) चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जेन्सेन हुआंग (Jensen Huang) यांच्या एका कबुलीने खळबळ उडाली आहे. जेन्सेन हुआंग यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवला आहे. या ई-मेलमध्ये त्यांनी एका संशयित चिनी गुप्तहेरासोबत आपले प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे. एका परदेशी गुप्तचर संस्थेने आखलेल्या कटाचे जेन्सेन हुआंग हे लक्ष्य होते, अशा बातम्या समोर आल्यानंतर त्यांनी ही कबुली दिली आहे. त्यांच्या खुलाशानंतर एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे.
'द न्यूयॉर्क टाइम्स'ने 29 ऑक्टोबर रोजी दिलेल्या वृत्तानुसार, जेन्सेन हुआंग हे एका चिनी हेरगिरी कटाचे लक्ष्य होते, जो ॲलिस हुआंग (Alice Huang alias Huang Le) नावाच्या एका चिनी व्यावसायिक महिलेद्वारे आखण्यात आला होता. तिने जेन्सेन हुआंग यांच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण केले होते. ही महिला प्रगत एनव्हिडिया एआय चिप्स व गुप्त माहिती बीजिंगला पुरवत होती. सिंगापूरस्थित डेटा सेंटर कंपनी 'मेगास्पीड'मधील एक उच्च अधिकारी आणि चिनी नागरिक असलेल्या ॲलिस हुआंग यांना अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थांनी चीनसाठी एक गुप्त माहिती पुरवणारी व्यक्ती म्हणून ओळख पटवली होती.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या एका ईमेलमध्ये, जेन्सेन हुआंग यांनी आपल्या कुटुंबाची आणि कर्मचाऱ्यांची जाहीर माफी मागितली आहे. हुआंग यांनी लिहिले, "मी माझ्या कुटुंबाची आणि तुम्हा सर्वांची माफी मागतो. मी माझ्या पत्नीशी प्रतारणा केली आहे. माझ्या कृत्यामुळे माझ्या पत्नीला आणि मुलांना खूप दुःख झाले आहे."
"मी जे काही केले आहे, त्याला कोणतेही समर्थन नाही. मला मनापासून खेद वाटतो." त्यांनी स्पष्ट केले की, आपल्या कृतीची आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची पूर्ण जबाबदारी ते स्वीकारतात आणि होणारी सर्व टीकाही मान्य करतात.
याव्यतिरिक्त, हुआंग यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्याच्या आणि 'एनव्हिडिया'च्या (Nvidia) हितांचे जतन करण्याच्या आपल्या दृढ वचनबद्धतेवर भर दिला. त्यांनी कंपनीच्या संचालक मंडळाने सुरू केलेल्या स्वतंत्र चौकशीत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच, आपल्या वैयक्तिक निर्णयांसाठी आपल्या कुटुंबाला त्रास देऊ नये आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर राखावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
सीईओंनी दिलेल्या कबुलीनंतर एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. रविवारी यासंदर्भात अधिकृत निवेदन काढत त्याची पुष्टी करण्यात आली. संचालक मंडळाने स्पष्ट केले की, सध्या राष्ट्रीय सुरक्षेला किंवा कंपनीच्या गोपनीय तांत्रिक माहितीशी तडजोड केल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही; तरीही, सर्व उपलब्ध तथ्यांची सखोल तपासणी केली जाईल.
स्वतंत्र संचालकांची एक समिती या चौकशीवर देखरेख ठेवणार आहे. बोर्डाने हुआंग आणि त्यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास कायम ठेवला आहे. दरम्यान, या विषयाबाबत विचारले असता, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी भाष्य करण्यास नकार दिला आणि याला कंपनीची "अंतर्गत कॉर्पोरेट बाब" असे संबोधले.
सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेली 'मेगास्पीड' (Megaspeed) नावाची कंपनी अमेरिकेच्या वाणिज्य विभागाच्या (U.S. Department of Commerce) चौकशीच्या कक्षेत आहे. अमेरिकेच्या निर्बंधांना बगल देऊन, चीनला 'एनव्हिडिया' (Nvidia) चिप्स मिळवून देण्यात ही कंपनी मदत करत होती का, याचा तपास या चौकशीद्वारे केला जात आहे.
या विषयावर भाष्य करताना जेन्सेन हुआंग यांनी सांगितले की, एनव्हिडियाचे मेगास्पीड आणि त्यांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतचे संबंध पूर्णपणे सामान्य आणि व्यावसायिक होते. त्यांनी असेही नमूद केले की, त्यांच्या 'जीपीयू' (GPU) चिप्सचा पुरवठा आणि वापर याबद्दलचा संपूर्ण रेकॉर्ड त्यांनी जपून ठेवला आहे.