• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /AI चा फुगा फुटला? अमेरिकेत हाहाकार, गुंतवणुकदारांचे 560 कोटी बुडाले

AI चा फुगा फुटला? अमेरिकेत हाहाकार, गुंतवणुकदारांचे 560 कोटी बुडाले

एआयचा फुगा फुटला? अशी शक्यता निर्माण होणारी परिस्थिती अमेरिकेन शेअर बाजारात निर्माण झाली आहे. त्याचे कारणही तसेच आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 21, 2026, 12:01 IST|Updated: Nov 21, 2026, 12:06 IST
joinshare
AI चा फुगा फुटला? अमेरिकेत हाहाकार, गुंतवणुकदारांचे 560 कोटी बुडाले
Image Credit: AI Bubble Brust in US

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

2

मुंबईत मॅनहोलच्या एका झाकणासाठी 25 हजार रुपये! चोरी रोखण्यासाठी BMC आणणार नवी यंत्रणा!

3

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईचं नेपाळ कनेक्शन, अभिनेत्यावर गोळी चालवण्याआधी...

4

रविवार 22 नोव्हेंबर रोजी किती आहेत LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या आजचे रेट्स

5

सोन्याच्या किंमती घसरल्यानंतर PM मोदींची पुन्हा मोठी भविष्यवाणी, पुढील 20 वर्षांचं सांगितलं भाकीत

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठी घसरण एकाच आठवड्यात अमेरिकन बाजारात झाली आहे. ही घसरण आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कंपन्यांच्या व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या संभाव्यतेबद्दल वाढत्या चिंतेमुळे झाली असल्याचा दावा केला आहे.

स्टॉक मार्केटमधील घसरणीमुळे, गेल्या आठवड्यात अमेरिकन शेअर बाजाराचे एकूण बाजारमूल्य अंदाजे 6 ट्रिलियन डॉलर्सने घसरले आहे. जे भारतीय चलनानुसार 560 लाख कोटी रुपये इतके आहे. म्हणजे एका दिवसांतच 1 ट्रिलियन डॉलर्स इतके नुकसान सोसले. एस अँड पी 500 सलग सात ट्रेडिंग सत्रांपासून घसरत आहे, ही 2020 नंतरची  सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.

शुक्रवारी मार्केटमध्ये  एआय कंपनी अँथ्रोपिकच्या आयपीओबद्दल आशा निर्माण झाली होती. तेव्हापासूनच ही घसरण अधिक तीव्र झाली आहे. परंतु आयपीओ लिस्टिंग होताच आणखी मोठी घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांनी एआय संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड नफा कमावला आहे, ज्यामुळे नॅसडॅक कंपोझिटला 2026 मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा तोटा झाला. तसेच गेल्या ६ वर्षांतील निर्देशांकासाठी हा सर्वात वाईट आठवडा होता. तर एस अँड पी 500 आणि डाऊ जोन्स त्यांच्या विक्रमी पातळीवरून 10 टक्क्यांनी घसरले आहेत. मार्केट 10 टक्क्यांनी घसरल्यानंतर करेक्शनची परिस्थिती मानली जात आहे.

नॅस्डॅक कंपोझिट 5.28 टक्क्यांनी घसरून 22,617.73 वर बंद झाला, जी वर्षाच्या सुरुवातीपासून 2.7 टक्क्यांची घसरण आहे. एस अँड पी 500 3.7 टक्क्यांनी घसरून 6,910.39 वर बंद झाला. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज 949.73 अंकांनी, म्हणजेच 1.93 टक्क्यांनी घसरून 48,147.33 वर आला. नॅस्डॅक 100 मध्ये 5.6 टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली गेली, जो व्यवहारादरम्यान त्याच्या अलीकडील उच्चांकावरून 20 टक्क्यांनी खाली आला.

मार्केटमध्ये अचानक इतकी घसरण का?

मार्केटमध्ये आलेली ही घसरण AI मुळं झाल्याचं मानण्यात येतंय. एआय (AI) बाबत गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन बदलत आहे. कंपन्यांचा एआयवरील प्रचंड खर्च, डेटा सेंटर बांधकामाची  गती आणि या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठीच्या निधीत झालेली घट, यामुळे तंत्रज्ञान कंपन्यांच्या कमाईच्या अपेक्षांवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे.

दुसरीकडे, गुंतवणूकदार आता सुरक्षित मालमत्तेकडे वळत आहेत, ज्यामुळे एआय आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. गुंतवणूकदार बॉण्ड मार्केट आणि भारतासारख्या बाजारपेठांमध्ये आपली गुंतवणूक वाढवत आहेत.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Donald Trump
Stock Market
Commodity Market