पॅराग्वे बँक : भारतासह अनेक देशांमध्ये बँका दिवळखोरीत निघतात अनेक बँका कोसळतात. याचा थेट परिणाम ग्राहकांवर होतो. अनेक ग्राहकांचे पैसे बुडतात. मात्र, सरकारवर याचा कोणताही परिणाम होत नाही. पॅराग्वे देशात बँक बुडाल्याने सरकार कोसळले आहे. राष्ट्राध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला आहे.
बँक बुडाल्याने चार दिवसांत पॅराग्वेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. पॅराग्वेची निम-सरकारी 'उनो बँक' कोसळली आहे. यामुळे निम्म्या लोकसंख्येने आपले पैसे गमावले आहेत. निधीच्या कमतरतेमुळे देशव्यापी आंदोलने सुरू झाली. याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला.
राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना यांच्या पक्षाविरोधात जनक्षोभ उफाळून आला. सँटियागो पेना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. सध्या संसदेत त्यांच्या विरोधात महाभियोगाची प्रक्रिया राबवली जात आहे. पॅराग्वे हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे.
उनो बँक ही वेगाने वाढणारी डिजिटल बँक आहे. ही बँक कोसळल्यामुळे एक मोठे आर्थिक आणि राजकीय संकट निर्माण झाले आहे. 65 लाख लोकसंख्येपैकी जवळपास 30 लाख ग्राहकांच्या बचत खात्यातील पैसे अडकले. बँक कोसळल्यामुळे मोठं आर्थिक संकट निर्माण झाले. यामुळे अब्जावधी डॉलर्सचा सरकारी निधीही अडकला. या मोठ्या आर्थिक संकटामुळे राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेन्या यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले.
पराग्वेच्या सिनेटने महाभियोगाद्वारे पेन्या यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. त्यानंतर उपराष्ट्रपती पेड्रो अलेना यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. उपराष्ट्रपती पेड्रो अलेना यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली. महाभियोगानंतर पेन्या यांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले.
3 नोव्हेंबर 2026 रोजी पॅराग्वेच्या मध्यवर्ती बँकेने युएनो बँकेचा ताबा घेतला. नियामकांना बँकेच्या आर्थिक परिस्थितीत झपाट्याने बिघाड होत असल्याचे आढळले. यामुळे चौकशी, निदर्शने आणि राष्ट्राध्यक्षांविरुद्ध महाभियोगाची प्रक्रिया सुरू झाली. पराग्वे हा ब्राझील, अर्जेंटिना आणि बोलिव्हिया या देशांच्या सीमा असलेला एक दक्षिण अमेरिकन देश आहे. कृषी निर्यात आणि जलविद्युत यावर या देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. ग्रुपो वास्केझने 2021 मध्ये फायनान्सिएरा एल कॉमेर्सिओचे अधिग्रहण करून त्याचे फायनान्सिएरा युएनोमध्ये रूपांतर केले.
फेब्रुवारी 2022 मध्ये, बँकेने आपला डिजिटल बँकिंग ब्रँड सुरू केला. त्यानंतर, 2024 मध्ये, बँकेने व्हिजन बँकेचे अधिग्रहण करून तिचे विलीनीकरण करण्यात आले. यामुळे बँकेचा ग्राहकवर्ग आणि व्यवसाय झपाट्याने विस्तारला. युएनो बँकेसोबत सुमारे 30 लाख ग्राहक जोडले गेले. ही बँक सरकारी संस्था आणि पेन्शन निधीसह सुमारे 85 कोटी डॉलर्सच्या सरकारी निधीचे व्यवस्थापन करत होती.
युएनो बँकेच्या आर्थिक स्थिती डबघाईला आली. भांडवलात आणि कर्जाच्या गुणवत्तेत घट झाला. बँकेच्या मालमत्तेतील त्रुटी, चुकीच्या पद्धतीने नोंदवलेले व्यवहार आणि ग्रुपो वास्केझशी संबंधित कंपन्यांना दिलेल्या कर्जांमध्ये कमतरता अशा अनेक त्रुटी पॅराग्वेच्या मध्यवर्ती बँकेने निदर्शनास आणून दिल्या. असोसिएटेड प्रेसने याबाबतचे वृत्त दिले. मध्यवर्ती बँकेच्या निरीक्षकांनी जून महिन्यातच बँकेतील अंतर्गत कर्जपुरवठ्यातील अनियमितता समोर आणली होती.
बँकेने आपल्या मालकांशी संबंधित कंपन्यांना कायदेशीर मर्यादा ओलांडून आणि पुरेशा हमीशिवाय मोठी कर्जे दिल्याचे तपासणीत समोर आले होते. जेव्हा नियामकांनी उएनोच्या खात्यांचे लेखापरीक्षण केले, तेव्हा बँकेचे भांडवल कायद्याने आवश्यक असलेल्या किमान मर्यादेच्या निम्म्यापेक्षा कमी झाले होते. यानंतर, मध्यवर्ती बँकेने 3 नोव्हेंबर रोजी बँकेविरुद्ध कारवाई सुरू केली. ठेवी आणि वसूल करण्यायोग्य मालमत्ता इतर बँकांमध्ये हस्तांतरित करण्यात आल्या.
बँक बुडाल्याचा परिमाण फक्त सामान्य ग्राहकांवरच नाही तर सरकारवरही झाला. सरकारचे निवृत्तीवेतन आणि आरोग्य निधीच्या सुमारे 380 दशलक्ष डॉलर्सच्या ठेवी आणि गुंतवणूक युएनो बँकेत होत्या. बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणारे सुमारे 32,000 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर ही याचा परिणाम झाला. सरकारने नंतर एका कायद्याला मंजुरी दिली, ज्यानुसार प्रभावित ठेवीदारांना पाच कामकाजाच्या दिवसांत पैसे परत करण्यासाठी राज्य हमी निधीची तरतूद करण्यात आली. लहान खाती असलेल्या ग्राहकांना 5 नोव्हेंबरपासून सुरुवातीचे पैसे देण्यास सुरुवात झाली.
ग्रुपो वास्केझशी असलेल्या संबंधांमुळे अध्यक्ष सँटियागो पेन्या यांचे नाव या प्रकरणात जोडले गेले आहे. पेन्या यांनी अर्थशास्त्रज्ञ म्हणून आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत काम केले आहे. ऑगस्ट 203 मध्ये ते पॅराग्वेचे अध्यक्ष झाले. अहवालानुसार, पेन्या यांची पूर्वी ग्रुपो वास्केझमध्ये हिस्सेदारी होती. तथापि, त्यांनी मार्च 2025 मध्ये आपली हिस्सेदारी विकल्याचा दावा त्यांनी केला आहे. बँकेत कोणतीही थेट गुंतवणूक केल्याचे वृत्त त्यांनी नाकारले आहे.
दरम्यान, फायनान्सिएरा उएनोचे माजी प्रमुख कार्लोस कार्वाल्लो यांची पेना यांनी पॅराग्वेच्या मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. उएनो बँकेच्या कामकाजावर झालेल्या टीकेनंतर, कार्वाल्लो यांनी राष्ट्रपतींच्या विनंतीनुसार 3 नोव्हेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
माजी राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना, त्यांच्यावरील महाभियोगाच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी अभियोक्त्यांसमोर हजर होण्यासाठी महाधिवक्ता कार्यालयात आले. युएनो बँक संकटाच्या संबंधात त्यांच्यावर चौकशी सुरू आहे. अभियोक्त्यांनी म्हटले आहे की, पेना यांच्यावरील आरोप अद्याप अंतिम केले जात आहेत आणि त्यात पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही असू शकतो.
पॅराग्वेच्या अभियोक्त्यांनी 6 नोव्हेंबर रोजी पेना आणि माजी केंद्रीय बँक प्रमुख कार्लोस कार्व्हॅलो यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. आर्थिक गुन्हे आणि भ्रष्टाचारविरोधी पथकासमोर हजर करेपर्यंत पेना यांना त्यांच्या घरीच नजरकैदेत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.