सकाळचा वेळ धावपळीचा असतो, त्यावेळी अनेक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी एक चांगला आणि स्वादिष्ट नाश्ता दिवसभर ऊर्जा देऊ शकतो. सकाळच्या नाश्ताला काय बनवायचे हा रोजचा एक प्रश्न असतो. आजच्या लेखामध्ये तुम्हाला दिवसभर आपली ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करेल अशा नाश्त्याची रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत. अनेकांना नाश्ता पूर्णपणे वगळण्याची किंवा घाईगडबडीत नाश्ता न करण्याची सवय असते, दररोज तोच नाश्ता खाऊन अनेकदा कंटाळा येतो, जर तुम्हाला दररोज तेच पोहे, उपमा किंवा सँडविच खाऊन कंटाळा आला असेल, तर ब्रेड पोहा करून पहा.
ब्रेड पोहा ही रेसिपी कमी साहित्यामध्ये तयार होते, ही झटपट आणि चविष्ट रेसिपी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आता ब्रेड पोहा कसा तयार करायचा यासंदर्भात सविस्तर रेसिपी जाणून घ्या.
2 टेबलस्पून तेल
1/8 चमचा हिंग
5-6 कढीपत्ता
2 अख्ख्या लाल मिरच्या
1 कप उकडलेले वाटाणे
1/2 कप भाजलेले शेंगदाणे
1 चमचा हळद पावडर
1 छोटा चमचा मीठ (चवीनुसार)
ब्रेडचे 4 तुकडे (लहान तुकड्यांमध्ये कापलेले)
2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
1 मोठा चमचा लिंबाचा रस
1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
किसलेला नारळ (सजावटीसाठी)
ब्रेड पोहे तयार करण्यासाठी सर्वात आधी एका पॅन किंवा कढईत तेल गरम करा आणि तेल गरम झाल्यावर त्यात हिंग घाला. गरम तेलामध्ये आता मोहरी, कढीपत्ता आणि अख्ख्या लाल मिरच्या घालून काही सेकंद तडतडू द्या. त्यानंतर उकडलेले वाटाणे घालून हलके परतून घ्या. आता भाजलेले शेंगदाणे घालून चांगले मिसळा. आता हळद आणि मीठ घाला आणि त्यानंतर ब्रेडचे कापलेले तुकडे घालून सर्व व्यवस्थित एकत्र मिसळा.
हे ही वाचा
पाव मऊ राहावा यासाठी त्यावर थोडे पाणी शिंपडा आणि हलक्या हाताने मिसळा, जेणेकरून पावाचे तुकडे तुटणार नाहीत. आता बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस आणि हिरवी कोथिंबीर घालून चांगले मिसळा. शेवटी, किसलेल्या नारळाने सजवा आणि गरमागरम मसालेदार ब्रेड पोहे सर्व्ह करा.