SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

उरलेल्या ब्रेडपासून बनवा झणझणीत ब्रेड पोहे; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल! वाचा सोपी रेसिपी

ब्रेड पोहा ही रेसिपी कमी साहित्यामध्ये तयार होते, ही झटपट आणि चविष्ट रेसिपी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आता ब्रेड पोहा कसा तयार करायचा यासंदर्भात सविस्तर रेसिपी जाणून घ्या.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 15, 2026, 08:58 PM IST | Updated: Nov 15, 2026, 09:07 PM IST
Join

सकाळचा वेळ धावपळीचा असतो, त्यावेळी अनेक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी एक चांगला आणि स्वादिष्ट नाश्ता दिवसभर ऊर्जा देऊ शकतो. सकाळच्या नाश्ताला काय बनवायचे हा रोजचा एक प्रश्न असतो. आजच्या लेखामध्ये तुम्हाला दिवसभर आपली ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करेल अशा नाश्त्याची रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत. अनेकांना नाश्ता पूर्णपणे वगळण्याची किंवा घाईगडबडीत नाश्ता न करण्याची सवय असते, दररोज तोच नाश्ता खाऊन अनेकदा कंटाळा येतो,  जर तुम्हाला दररोज तेच पोहे, उपमा किंवा सँडविच खाऊन कंटाळा आला असेल, तर ब्रेड पोहा करून पहा.

ब्रेड पोहा ही रेसिपी कमी साहित्यामध्ये तयार होते, ही झटपट आणि चविष्ट रेसिपी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आता ब्रेड पोहा कसा तयार करायचा यासंदर्भात सविस्तर रेसिपी जाणून घ्या.

ब्रेड पोहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

2 टेबलस्पून तेल
1/8 चमचा हिंग
5-6 कढीपत्ता
2 अख्ख्या लाल मिरच्या
1 कप उकडलेले वाटाणे
1/2 कप भाजलेले शेंगदाणे
1 चमचा हळद पावडर
1 छोटा चमचा मीठ (चवीनुसार)
ब्रेडचे 4 तुकडे (लहान तुकड्यांमध्ये कापलेले)
2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
1 मोठा चमचा लिंबाचा रस
1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
किसलेला नारळ (सजावटीसाठी)

ब्रेड पोहे कसे बनवायचे?

ब्रेड पोहे तयार करण्यासाठी सर्वात आधी एका पॅन किंवा कढईत तेल गरम करा आणि तेल गरम झाल्यावर त्यात हिंग घाला. गरम तेलामध्ये आता मोहरी, कढीपत्ता आणि अख्ख्या लाल मिरच्या घालून काही सेकंद तडतडू द्या. त्यानंतर उकडलेले वाटाणे घालून हलके परतून घ्या. आता भाजलेले शेंगदाणे घालून चांगले मिसळा. आता हळद आणि मीठ घाला आणि त्यानंतर ब्रेडचे कापलेले तुकडे घालून सर्व व्यवस्थित एकत्र मिसळा.

हे ही वाचा

भाजी नव्हे, टोमॅटो-दुधी भोपळ्यापासून बनवा स्वादिष्ट 'केशरी हलवा'; पाहुणेही विचारतील रेसिपी

पाव मऊ राहावा यासाठी त्यावर थोडे पाणी शिंपडा आणि हलक्या हाताने मिसळा, जेणेकरून पावाचे तुकडे तुटणार नाहीत. आता बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस आणि हिरवी कोथिंबीर घालून चांगले मिसळा. शेवटी, किसलेल्या नारळाने सजवा आणि गरमागरम मसालेदार ब्रेड पोहे सर्व्ह करा.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES