• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाइफस्टाइल
  • /कधी खाल्ले आहेत का रव्याचे मोमोज? घरच्या घरी बनवा भन्नाट मोमोज

कधी खाल्ले आहेत का रव्याचे मोमोज? घरच्या घरी बनवा भन्नाट मोमोज

आज तुम्हाला या लेखामध्ये रव्याच्या मोमोजची रेसिपी सांगणार आहोत. हे मोमोज कसे आणि कोणकोणत्या साहित्यापासून तयार होतात या पदार्थाची रेसिपी सविस्तर वाचा.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 18, 2026, 20:43 IST|Updated: Nov 18, 2026, 20:44 IST
joinshare
कधी खाल्ले आहेत का रव्याचे मोमोज? घरच्या घरी बनवा भन्नाट मोमोज

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

आजकाल फास्टफूड खाण्याची सवय अनेकांना लागली आहे, सोशल मिडियावर देखील अनेक वेगवेगळे फास्टफूड पाहायला मिळतात. स्ट्रिटवर अनेक वडापाव, चायनीज फूड त्याचबरोबर अनेकांना आता सध्या मोमोजचा चस्का लागला आहे. मोमोज खायला कोणाला आवडत नाही, पातळ थर, चविष्ट सारण आणि मसालेदार लाल चटणी चाटात असली की मोमोज खाण्यात एक वेगळीच मजा असते. पण रोज जर आपण मैद्याचे मोमोज खाल्ल्याने आपण आपल्या आरोग्याशी खेळत आहोत असे वाटते. पण, जर तुम्हाला खरंच मोमोज खायचे असतील, तर तुम्ही रव्याचे मोमोज बनवून खाऊ शकता.

आज तुम्हाला या लेखामध्ये रव्याच्या मोमोजची रेसिपी सांगणार आहोत. रव्याचे मोमोज चवीला अगदी मैद्याच्या मोमोजसारखेच लागतात, पण ते मैद्याच्या मोमोजपेक्षा अधिक आरोग्यदायी असतात. हे मोमोज कसे आणि कोणकोणत्या साहित्यापासून तयार होतात या पदार्थाची रेसिपी सविस्तर वाचा.

रव्याचे मोमोज बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • रवा – 1 कप
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – एक चमचा
  • पाणी – पीठ मळण्यासाठी
  • सोया चंक्स – 1/2 कप
  • कोबी – 1/4 कप
  • गाजर – 1/4 कप
  • कांद्याची पात – 1 किंवा 2
  • कांदा – 1 छोटा
  • लसूण – 2-3 
  • आले – अर्धा इंच
  • काळी मिरी – चवीनुसार

कसे तयार करायचे रव्याचे मोमोज?

रव्याचे मोमोज तयार करण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात रवा घ्या, त्यात थोडे मीठ आणि कोमट पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ मळताना पीठ मऊ आणि लवचिक असावे ही एक महत्त्वाची टीप आहे. आता ते एका ओल्या कापडाने झाकून ठेवा. जर पीठ एकत्र येत नसेल, तर तुम्ही त्यात थोडे दूध घालू शकता. त्यानंतर मोमोजचे सारण तयार करण्यासाठी सर्व भाज्या बारीक चिरुन घ्या किंवा खिसून घ्या. त्यानंतर एक पातेल्यामध्ये पाणी घालून सोया चंक्स उकळून घ्या. सोया चंक्स शिजल्यावर त्यातील सर्व पाणी पिळून काढा. त्यानंतर, सोया चंक्स वाटून त्याची पेस्ट बनवा.

हे ही वाचा

उरलेल्या ब्रेडपासून बनवा झणझणीत ब्रेड पोहे; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल! वाचा सोपी रेसिपी

पॅनमध्ये सोया चंक्स घालून 1-2 मिनिटे शिजवा. त्यानंतर, सर्व भाज्या घालून 2 मिनिटे परता. त्या जास्त शिजू नयेत याची काळजी घ्या. चवीनुसार मीठ आणि काळी मिरी घाला. जर हे लहान मुलांसाठी नसेल, तर तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा घालू शकता. हे मिश्रण खोलीच्या तापमानावर थंड होऊ द्या. मळलेला रव्याचा गोळा 15-20 मिनिटे बाजूला ठेवल्यानंतर, त्याचे छोटे गोळे बनवून मोमोज तयार करा. पीठ लाटून झाल्यावर त्यात सारण भरा आणि मोमोजचा आकार द्या. नंतर, मोमोज स्टीमरमध्ये ठेवून 15 ते 20 मिनिटे शिजवा. याऐवजी, तुम्ही हे मोमोज 20 मिनिटे पाण्यात उकळू शकता. उकळल्यास, पाणी गाळून घ्या आणि मोमोज वेगळे करा. तुमचे स्वादिष्ट रव्याचे मोमोज तयार आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
recipes