• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाइफस्टाइल
  • /महागडे मॉस्किटो लिक्विड विसरा! लिंबाचा असा करा वापर, डास राहतील दूर

महागडे मॉस्किटो लिक्विड विसरा! लिंबाचा असा करा वापर, डास राहतील दूर

घरात सतत रासायनिक कॉइल्स किंवा द्रव जाळल्याने रासायनिक वास येतो आणि त्यामुळे डोळ्यांची जळजळ व इतर समस्या उद्भवू शकतात. त्रास न होणारा घरगुती उपाय कोणते यासंदर्भात सांगणार आहोत.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 02, 2026, 10:27 PM IST|Updated: Oct 02, 2026, 10:33 PM IST
joinshare
महागडे मॉस्किटो लिक्विड विसरा! लिंबाचा असा करा वापर, डास राहतील दूर

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

घरामध्ये थोडी फार दुर्गंधी दिसली लगेचच मच्छर येतात, आता हिवाळा काही दिवसांमध्ये येणार आहे आणि त्यामुळे मग डासांचा उपद्रवही वाढतो. अशा परिस्थितीमध्ये डास जाण्यासाठी काय उपाय करावे हे सुचत नाही, सामान्य उपायांबद्दल सांगायचे झाले तर आपण अनेकदा धुरी करतो किंवा मग बाजारामध्ये मिळणारे गुड नाईट वापरतो. यावर कायमचा डासांना घालावण्यासाठी तोडगा काय यासंदर्भात तुम्हाला आज सांगणार आहोत. घरात सतत रासायनिक कॉइल्स किंवा द्रव जाळल्याने रासायनिक वास येतो आणि त्यामुळे डोळ्यांची जळजळ व इतर समस्या उद्भवू शकतात. यावर शरीराला कोणताही त्रास न होणारा घरगुती उपाय कोणते यासंदर्भात सांगणार आहोत.

लिंबाने डास कसे पळवून लावावेत

डासांना दूर ठेवण्यासाठी घरगुती उपाय करून पाहता येतात. येथे, डासांपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करणाऱ्या लिंबाच्या उपायांबद्दल जाणून घ्या.

लिंबाच्या सालीत कापूर जाळा

लिंबाची साल घ्या, त्यात कापराचे तुकडे टाका आणि पेटवा. याऐवजी, तुम्ही लिंबाच्या रसात मोहरीचे तेल आणि वात घालूनही ज्योत पेटवू शकता. लिंबाच्या धुरामुळे डास नैसर्गिकरित्या दूर राहण्यास मदत होते.

लिंबापासून स्प्रे बनवणे

तुमच्या घरामध्ये सातत्याने डास येत असतील तर मग डासांची फवारणी करण्यासाठी खोली बराच वेळ बंद ठेवावी लागते, ज्यामुळे रासायनिक घटक असलेली हवा श्वासावाटे आत घेणे टाळता येते. जर तुम्ही लिंबाची फवारणी केली तर तुम्हाला खोलीच्या बाहेर जाण्याची गरज लागणार नाही, त्याचबरोबर लिंबाची फवारणी केली तर मग डास देखील पळून जातील. लिंबाची फवारणी तयार करण्यासाठी प्रत्येक कप पाण्यात दीड लिंबाचा रस पिळा. जर तुम्हाला जास्त प्रमाणात फवारणी करायची असेल आणि जास्त पाण्याची गरज असेल, तर त्यानुसार अधिक लिंबाचा रस घाला. दोन्ही घटक एका स्प्रे बॉटलमध्ये एकत्र करा आणि डासांवर फवारा.

लिंबू आणि लवंग रेसिपी

हा डास घालवण्याचा एक खुप सोपा उपाय आहे, सर्वात आधी एक लिंबू घ्या आणि त्याला अर्धा कापा आणि रस असलेल्या भागामध्ये लवंग घाला. लिंबू आणि लवंग तुमच्या घराच्या एका कोपऱ्यात ठेवा. तुम्ही हे लिंबू आणि लवंग अशा ठिकाणीही ठेवू शकता जिथे डासांचा जास्त प्रादुर्भाव असतो. लवंग आणि लिंबाच्या सुगंधामुळे डास दूर राहतात.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Health News
Lifestyle News