SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

याच्या समोर चिकन लॉलीपॉपही फेल, घरातील साध्या भाज्यांपासून बनणारी ही रेसिपी आजच ट्राय करा

Veg Cutlet Lolipop Recipe : घरच्या घरी उपलब्ध असलेल्या भाज्यांपासून तुम्ही चमचमीत असे व्हेज कटलेट लॉलीपॉप बनवू शकता. भरपूर भाज्या असल्याने ते शरीरासाठी सुद्धा योग्य ठरतील आणि तुमचे जिभेचे चोचले देखील पुरवले जातील.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 24, 2026, 22:15 IST | Updated: Nov 24, 2026, 22:47 IST
Image Credit: याच्या समोर चिकन लॉलीपॉपही फेल, घरातील साध्या भाज्यांपासून बनणारी ही रेसिपी आजच ट्राय करा
Join

Veg Cutlet Lolipop Recipe : चिकन लॉलीपॉप खायला अनेकांना आवडतं, मात्र शाकाहारी लोकांसाठी सुद्धा एक भन्नाट स्नॅक्स ऑप्शन घेऊन आलो आहोत. बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी नरम आणि फ्लेवर फुल असलेला व्हेज लॉलीपॉप तुमच्या घरी उपलब्ध असलेल्या साध्या भाज्यांचा वापर करून अगदी झटपट बनवू शकता. शेफ अरुणा विजय हिने सुद्धा या व्हेज कटलेट लॉलीपॉपची रेसिपी शेअर केली आहे. संध्याकाळी चहा सोबत हा एक परफेक्ट स्नॅक्स ऑप्शन आहे.

व्हेज लॉलीपॉपमध्ये खूप भाज्या सुद्धा आहेत ज्यामुळे हे शरीरासाठी फायदेशीर ठरते. जर तुम्हाला डीप फ्राय करायचं नसेल तर तुम्ही एअर फ्रायरचा सुद्धा वापर करू शकता. तेव्हा स्टेप बाय स्टेप रेसिपी जाणून घेऊयात.

सामग्री :

तेल 3 मोठे चमचे
जिरे 1 छोटा चमचा
आले-मिरची पेस्ट 1 मोठा चमचा
कांदा 1 कप, बारीक चिरलेला
बीन्स (फरसबी) ½ कप, बारीक चिरलेली
गाजर 1 कप, किसलेले
हिरवे वाटाणे ½ कप
उकडलेले बटाटे 4, स्मॅश केलेले (कुस्करलेले)
अक्रोड 2 मोठे चमचे, तुकडे केलेले
मिरी पूड 1 छोटा चमचा
जिरे पूड 1 छोटा चमचा
गरम मसाला ½ छोटा चमचा
लाल तिखट १ छोटा चमचा
धणे पूड 1 छोटा चमचा
हळद ½ छोटा चमचा
मीठ चवीनुसार
कोथिंबीर 2 मोठे चमचे, बारीक चिरलेली

कोटिंगसाठी सामग्री :

मैदा – 3 मोठे चमचे
मीठ – चिमूटभर
पाणी – 3 ते 4 मोठे चमचे
ब्रेडक्रम्स (ब्रेडचा चुरा) – गरजेनुसार
तेल – शॅलो फ्राय करण्यासाठी (कमी तेलात तळण्यासाठी)

हेही वाचा : उरलेल्या ब्रेडपासून बनवा झणझणीत ब्रेड पोहे; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल! वाचा सोपी रेसिपी

कटलेट असेंबल करण्यासाठी :

आईस्क्रीमच्या काड्या
घट्ट दही (मीठ आणि साखर मिसळलेले)
हिरवी चटणी
लाल गोड चटणी
बारीक चिरलेले बदाम
बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर

व्हेज कटलेट करण्याची कृती :

तेल गरम करा, त्यात जिरे घाला, नंतर कांदा आणि आलं मिरचीची पेस्ट घाला. सर्व भाज्या, मॅश केलेले बटाटे, मीठ आणि मसाले घाला. सर्व एकत्र होऊन मिश्रण कोरडे होईपर्यंत शिजवा. ताजी कोथिंबीर घाला, मिश्रण थंड होऊ द्या, नंतर काड्या लावून लॉलीपॉपचा आकार द्या. पिठाच्या मिश्रणात बुडवा, ब्रेडक्रम्ब्स लावा आणि सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करा.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES