स्वयंपाक घरामध्ये आपण अनेक वेगवेगळे मसाले वापरतो, गरमा मसाला, लालमिर्ची, हळद, चाट मसाला असे अनेक प्रकारचे मसाले हे आपल्याला स्वयंपाकघरामध्ये पाहायला मिळतात. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर जवळजवळ दररोज केला जातो. भारतामध्ये खाल्ले जाणाऱ्या पदार्थांमध्ये हळद, लाल मिरची, धणेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला हे मसाले नसतील तर जेवण अपूर्ण वाटते. अनेकजण हे मसाले खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवतात, पण मसाले साठवण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का?
स्वयंपाकघरातील कपाटात किंवा डब्यांमध्ये साठवतात. मसाले अयोग्य पद्धतीने साठवल्याने त्यांची चव आणि सुगंध कमी होऊ शकतो, ज्यामुळे पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. अनेकदा जर तुम्ही ओल्या ठिकाणी मसाले साठवले तर त्यांनी बुरशी देखील येऊ शकते, जे फ्रिजमध्ये मसाल्यांची साठवणूक करतात त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. फ्रिजमधील डबा वारंवार उघडला जातो, तेव्हा तापमानातील बदलांमुळे आतमध्ये ओलावा जमा होऊ शकतो. यामुळे मसाले गोठू शकतात आणि अतिरिक्त ओलाव्यामुळे बुरशीसुद्धा येऊ शकते. म्हणून, रोजच्या वापरातील सुके मसाले फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी हवाबंद डब्यांमध्ये ठेवणे उत्तम.
हे ही वाचा
अख्खे असोत किंवा पावडरच्या स्वरूपात सुके मसाले सहसा फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नसते. ते मसाले थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या जागी ठेवावेत, थेट सूर्यप्रकाश नसलेले आणि ओलावा नसलेले कपाट निवडा. जर तुम्ही मसाले ओल्या भागामध्ये ठेवले तर त्यात ओलावा साचू शकतो, जेव्हा फ्रिजमधील डबा वारंवार उघडला जातो, तेव्हा तापमानातील बदलांमुळे आतमध्ये ओलावा जमा होऊ शकतो. ओलाव्यामुळे मसाले गोठतात आणि बुरशीसुद्धा लागते आणि रोजच्या वापरामधील सुके मसाले फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी हवाबंद डब्यांमध्ये ठेवणे उत्तम.
अख्खे मसाले साधारणपणे दळलेल्या मसाल्यांपेक्षा जास्त काळ आपली चव आणि सुगंध टिकवून ठेवतात. काळी मिरी, लवंग, वेलची आणि जिरे यांसारखे अख्खे मसाले दळून गरजेनुसार वापरणे चांगले. याउलट, मसाल्यांची पूड हवेच्या संपर्कात आल्यास तिचा सुगंध लवकर नाहीसा होऊ शकतो. म्हणून, ते कमी प्रमाणात खरेदी करा आणि हवाबंद डब्यांमध्ये साठवा. मसाले नेहमी स्वच्छ, कोरड्या आणि हवाबंद डब्यांमध्ये साठवले पाहिजेत. साठवणुकीची माहिती आणि अंतिम मुदत तपासण्यासाठी पॅकेजिंग तपासा. जर एखाद्या मसाल्याला बुरशी आलेली दिसत असेल, त्याला विचित्र वास येत असेल किंवा त्यावर ओलाव्याची स्पष्ट चिन्हे दिसत असतील, तर तो वापरू नका.