SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

त्वचेपासून ते केसांपर्यंत... आवळा खाल्ल्याने शरीराला मिळतात 4 मोठे फायदे, पंतप्रधान मोदींनीही केला उल्लेख

Amla Benefits : आवळा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. तेव्हा आवळ्याच्या सेवनाने शरीराला कोण कोणते फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊयात.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Sep 30, 2026, 08:58 AM IST | Updated: Sep 30, 2026, 09:51 AM IST
Join

Amla Benefits : आवळा घरात विविध कारणांसाठी वापरला जातो. त्याच्या सेवनाचे शरीरासाठी सुद्धा अनेक फायदे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाच्या  138 व्या एपिसोडमध्ये उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये आवळ्या विषयी सुरु असलेल्या कामांविषयी त्यांनी यात सांगितलं. प्रतापगडमध्ये आवळा कँडी, मुरंबा, ज्यूस, लोणचं इत्यादी बनवलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की आवळा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो, कारण त्यात 'व्हिटॅमिन सी'सारखी आवश्यक पोषक तत्वे असतात. तेव्हा आवळ्याच्या सेवनामुळे शरीराला होणारे फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊयात.

शरीराला मिळतं व्हिटॅमिन सी :

आवळ्यात व्हिटॅमिन सी आढळतं जे शरीरासाठी अत्यंत पोषक ठरतं आणि सामान्यपणे ते शरीरातील रोगांशी लढण्यासाठी मदत करते. व्हिटॅमिन सी शरीरात अँटीऑक्सिडंट म्हणूनही कार्य करते. तसेच, ते कोलेजेनच्या निर्मितीस मदत करते, जे त्वचा आणि शरीराच्या इतर भागांसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आहारात आवळ्यासारख्या फळांचा समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

पचनक्रिया चांगली राहते :

आवळ्यात फायबर असतं जे पोटासाठी आवश्यक ठरतं. खाण्यात पुरेसं फायबर असेल तर मल त्याग हा सामान्य राहण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या टाळण्यासही मदत होऊ शकते. मात्र जर एखाद्या व्यक्तीला जुनाट बद्धकोष्ठता किंवा पचनसंस्थेशी संबंधित एखादा विकार असेल, तर केवळ आवळा खाणे हा त्यावर उपाय ठरणार नाही. त्यामुळे याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

केसांसाठी फायदेशीर :

आवळ्यात व्हिटॅमिन सी सह इतरही पोषकतत्व असतात जे केसांसाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे केसांसाठी आवळ्याचा वापर हा अनेक वर्षांपासून केला जातोय. आवळ्याच्या सेवनामुळे केस गळणे थांबणे, नवीन केस उगवणे इत्यादी फायदे होतात. मात्र याविषयी ठोस सांगता येणार नाही. तेव्हा अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा.

त्वचेसाठी फायदेशीर :

आवळ्यात असलेल्या व्हिटॅमिन सी त्वचेसाठी सुद्धा गरजेचं असून यामुळे शरीरात कोलेजन बनवण्यास सुद्धा मदत होते. हेच कोलेजन त्वचेला स्वस्थ बनण्यासाठी सुद्धा मदत करते. याच कारणामुळे आवळ्याचा संबंध अनेकदा त्वचेच्या आरोग्याशी जोडला जातो. मात्र केवळ आवळा खाल्ल्याने चेहऱ्यावरील त्वचेच्या सर्व समस्या दूर होतील असा दावा करता येणार नाही. कारण निरोगी त्वचेसाठी संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि पुरेशी झोप घेणेही तितकेच आवश्यक आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES