• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाइफस्टाइल
  • /हेल्थ
  • /ट्रेंडिंग काळं मीठ ठरू शकतं धोकादायक; आयोडीनची कमतरता वाढवतेय चिंता

ट्रेंडिंग काळं मीठ ठरू शकतं धोकादायक; आयोडीनची कमतरता वाढवतेय चिंता

आहारात आयोडीन किंवा मीठ नसेल, तर शरीरात आयोडीनची कमतरता भासू शकते त्यामुळे फक्त शरीरामध्ये काही आजार देखील होऊ शकतात. पण तुम्ही काळे मीठ किंवा गुलाबी मीठ खात असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 22, 2026, 07:44 PM IST|Updated: Oct 22, 2026, 07:54 PM IST
joinshare
ट्रेंडिंग काळं मीठ ठरू शकतं धोकादायक; आयोडीनची कमतरता वाढवतेय चिंता

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

आयोडीन हे एक खनिज आहे आपण सर्वांनाच माहिती आहे, जे शरीरातील हार्मोन्स तयार करण्यासाठी गरजेचे असते. आयोडीन म्हणजेच मीठ हे आहाराच्या पदार्थांमध्ये असणे गरजेचे आहे, कारण असे फार कमी लोक भारतामध्ये आहेत जे जेवणामध्ये मीठ वापरत नाहीत. शरीर स्वतःहून आयोडीन तयार करत नाही, त्यामुळे त्याला आहारातून आपली गरज पूर्ण करावी लागते. तथापि, जर आहारात आयोडीन किंवा मीठ नसेल, तर शरीरात आयोडीनची कमतरता भासू शकते त्यामुळे फक्त शरीरामध्ये काही आजार देखील होऊ शकतात. ज्यामुळे व्यक्ती गलगंडासारख्या आजारांना बळी पडू शकते. या आयोडीनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, लोकांना वर्षानुवर्षे आयोडीनयुक्त मीठ खाण्याचा सल्ला दिला जात आहे, जेणेकरून शरीराला नैसर्गिकरित्या आयोडीन मिळू शकेल.

आजच्या आधुनिक युगामध्ये फिटनेससाठी घरामध्ये अनेकजण आयोडीनयुक्त मिठाऐवजी पिंक सॅाल्ट त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मीठ आहारामध्ये घेत असतात. आयोडीनयुक्त मिठाऐवजी काळे मीठ किंवा गुलाबी मीठ खाल्ल्याने शरीरात आयोडीनची कमतरता निर्माण होऊ लागली आहे. एम्सच्या एंडोक्राइनोलॉजी विभागातील प्राध्यापक रवींद्र गोस्वामी आणि डॉ. सोमा साहा यांच्या मते, या मिठात (काळे मीठ) आयोडीनचे प्रमाण खूप कमी असते. या आयोडीनच्या कमतरतेमुळे शरीरातील थायरॉईड हार्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात अडथळा येऊ शकतो आणि गलगंडाचा धोका वाढतो.

हे ही वाचा

रात्री उशीजवळ चार्जिंगला फोन ठेवता? झोपेवर होतो थेट परिणाम

गर्भवती महिलांमध्ये आयोडिन कमतरतेमुळे हे त्यांच्यावर तर परिणाम होणार आहेच त्याचबरोबर गर्भातील बाळाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेला नुकसान देखील होऊ शकतो. राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम 1962 मध्ये सुरू करण्यात आला आणि 1992 मध्ये त्याचे नाव राष्ट्रीय आयोडीन कमतरता विकार नियंत्रण कार्यक्रम असे झाले. या उपक्रमाचा उद्देश आयोडीनयुक्त मिठाची उपलब्धता वाढवणे आणि मिठाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करणे, मूत्रातील आयोडीनच्या पातळीवर लक्ष ठेवणे आणि लोकांमध्ये आयोडीन सेवनाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता.

2026 मध्ये 'द लॅन्सेट रीजनल हेल्थ साऊथ-ईस्ट एशिया' मध्ये प्रकाशित झालेल्या आयसीएमआरच्या (ICMR) एका अभ्यासानुसार, 10 ते 18 वयोगटातील 8,093 शालेय मुलांमध्ये गलगंडाचा प्रादुर्भाव दर 10.3 होता. त्यामुळे, आयोडीनच्या कमतरतेवर उपाययोजना करणे आणि आयोडीनयुक्त मीठ आहाराचा अनिवार्य भाग बनवणे याच्या महत्त्वावर जोर देणे आवश्यक आहे. मागील काही काळापासून सोशल मिडियावर त्याचबरोबर टेलिव्हिजनवर आरोग्य आणि आरोग्यदायी आजारावर भर दिला जात आहे त्यामुळे काळ्या मिठाला किंवा सैंधव मिठासारख्या मिठांना श्रेष्ठ म्हणून प्रोत्साहन दिले जात आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Lifestyle News
Marathi News
Health News