• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाइफस्टाइल
  • /हेल्थ
  • /आई किंवा आजीला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर मुलींनाही धोका? जाणून घ्या जेनेटिक रिस्कचं सत्य

आई किंवा आजीला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर मुलींनाही धोका? जाणून घ्या जेनेटिक रिस्कचं सत्य

आई, बहीण किंवा आजीला ब्रेस्ट कॅन्सर झाला असल्यास पुढच्या पिढीचा धोका काही प्रमाणात वाढू शकतो; पण कॅन्सर होणारच असे नाही. त्यामुळे कौटुंबिक इतिहासाची माहिती ठेवणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य वेळी तपासणी करणे अधिक महत्त्वाचे आहे.

Reported ByPravin Dabholkar
Published: Oct 02, 2026, 04:06 PM IST|Updated: Oct 02, 2026, 04:34 PM IST
joinshare
आई किंवा आजीला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर मुलींनाही धोका? जाणून घ्या जेनेटिक रिस्कचं सत्य
Image Credit: आई, बहीण किंवा आजीला ब्रेस्ट कॅन्सर झाला असल्यास पुढच्या पिढीचा धोका काही प्रमाणात वाढू शकतो; पण कॅन्सर होणारच असे नाही. त्यामुळे कौटुंबिक इतिहासाची माहिती ठेवणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य वेळी तपासणी करणे अधिक महत्त्वाचे आहे.

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कुटुंबातील एखाद्या जवळच्या व्यक्तीला स्तनाचा कर्करोग झाल्यानंतर पुढच्या पिढीतील महिलांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो—आई, बहीण किंवा आजीला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर आपल्यालाही हा आजार होण्याचा धोका आहे का? वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कौटुंबिक इतिहासामुळे धोका वाढू शकतो; मात्र याचा अर्थ पुढच्या पिढीला कॅन्सर होणारच असा नाही. स्तनाच्या कर्करोगातील केवळ काही प्रकरणे थेट वारशाने मिळालेल्या जनुकीय बदलांशी संबंधित असतात.

आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर धोका किती?

आई, बहीण किंवा मुलगी यांना फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हटलं जातं. अशा जवळच्या नातेवाईकाला स्तनाचा कर्करोग झालेला असल्यास सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत संबंधित महिलेचा धोका वाढू शकतो. उपलब्ध अभ्यासांमध्ये प्रथम श्रेणीतील नातेवाईकाच्या स्तनाच्या कर्करोगाच्या इतिहासामुळे धोका साधारण दुप्पट असू शकतो, असे नमूद आहे. मात्र हा सापेक्ष धोका आहे; याचा अर्थ त्या महिलेला 100 टक्के कॅन्सर होईल असा नाही.

आजी किंवा नानीला कॅन्सर असल्यास काय?

आजी किंवा नानी यांना सेकंट डिग्री रिलेटिव्ह मानले जाते. त्यांचा स्तनाच्या कर्करोगाचा इतिहासही महत्त्वाचा असतो; मात्र साधारणपणे आई किंवा बहिणीच्या तुलनेत त्याचा परिणाम कमी असू शकतो. कुटुंबात एकापेक्षा जास्त महिलांना, विशेषतः एकाच बाजूच्या कुटुंबात, स्तनाचा कर्करोग झाला असल्यास डॉक्टर अधिक काळजीपूर्वक कौटुंबिक इतिहास तपासण्याचा सल्ला देऊ शकतात.

BRCA1 आणि BRCA2 जनुकांचा संबंध काय?

काही महिलांमध्ये BRCA1 किंवा BRCA2 यांसारख्या जनुकांमध्ये वारशाने मिळालेला बदल असल्यास स्तन आणि अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. ICMRच्या माहितीनुसार, आनुवंशिक स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे एकूण स्तनाच्या कर्करोगाच्या तुलनेने लहान प्रमाणात असतात. लहान वयात कॅन्सर होणे, कुटुंबात अनेक जणांना स्तन किंवा अंडाशयाचा कर्करोग असणे, दोन्ही स्तनांमध्ये कॅन्सर होणे किंवा पुरुष नातेवाईकाला स्तनाचा कर्करोग होणे अशी काही संकेतस्थळे जनुकीय जोखमीकडे निर्देश करू शकतात.

प्रत्येक कौटुंबिक कॅन्सर आनुवंशिक असतो का?

नाही. कुटुंबात कॅन्सर असणे आणि तो आनुवंशिक असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कुटुंबातील सदस्यांमध्ये जनुके समान असण्याबरोबरच जीवनशैली, वातावरण आणि काही प्रजननाशी संबंधित घटकही सामायिक असू शकतात. वैद्यकीय माहितीनुसार बहुतेक स्तनाच्या कर्करोगाच्या प्रकरणांचा थेट संबंध वारशाने मिळालेल्या जनुकीय बदलांशी नसतो. त्यामुळे आई किंवा आजीला कॅन्सर झाला म्हणून पुढच्या पिढीला तो होणारच, असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.

कौटुंबिक हिस्ट्री असल्यास काय करावे?

कुटुंबात स्तनाचा कर्करोग असल्यास घाबरण्यापेक्षा डॉक्टरांकडे कौटुंबिक वैद्यकीय इतिहास सांगणे महत्त्वाचे आहे. कॅन्सर कोणत्या वयात झाला, कुटुंबातील किती सदस्यांना झाला आणि स्तन किंवा अंडाशयाच्या कर्करोगाची काही पद्धत दिसते का, याची माहिती डॉक्टरांसाठी उपयोगी ठरते. काही उच्च-जोखीम कुटुंबांमध्ये जेनेटिक काउन्सेलिंग किंवा जनुकीय चाचणीचा विचार केला जाऊ शकतो. ICMRच्या मार्गदर्शक माहितीनुसार मजबूत कौटुंबिक इतिहास किंवा कमी वयात स्तन/अंडाशयाचा कर्करोग झालेल्या प्रकरणांमध्ये जनुकीय मूल्यांकनाचा विचार केला जाऊ शकतो.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Health News
Lifestyle News
india