रोज अंडी खाणे धोकादायक? जाणून घ्या काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ, वाचा सविस्तर
दररोज अंडी खाल्ल्याने त्याचे तोटे देखील आहेत. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की दररोज अंडी खाल्ल्यामुळे र्करोगाचा धोकाही वाढू शकतो? यासंदर्भात डॅाक्टर काय म्हणतात यासंदर्भात वाचा.
व्यायाम शाळेत कसरत करणाऱ्या अनेकांना सल्ला दिला जातो की आरोग्यासाठी अंडी खाणे हे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. वेगवेगळे जीम ट्रेनर त्यांच्या विद्यार्थांना वेगवेगळे सल्ले देत असतात, अंड्यांमध्ये प्रथिनांसोबतच, त्यात असे अनेक पोषक घटक असतात जे स्नायू मजबूत करण्यास आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. अंडी खाणे लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण आपल्या आहारामध्ये पसंत करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? दररोज अंडी खाल्ल्याने त्याचे तोटे देखील आहेत. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की दररोज अंडी खाल्ल्यामुळे र्करोगाचा धोकाही वाढू शकतो?
कॅन्सर हीलर सेंटरमधील तज्ज्ञ डॉ. तरंग कृष्णा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ यासंदर्भात शेअर केला आहे, यामध्ये त्यांनी अंडी खाताना ती कुठून येतात आणि त्यांची गुणवत्ता काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय आरोग्य संघटनाच्या एका अहवालानुसार, अंडी खाणे आणि कर्करोगामुळे होणारे मृत्यू यांच्यात संबंध आढळून आला आहे. तथापि, अंड्यांमुळे कर्करोगाचा धोका केव्हा वाढू शकतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये तज्ज्ञ डॉ. तरंग कृष्णा यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
हे ही वाचा
तुमचं मूल माती किंवा भिंतीचा प्लास्टर खातंय? मुलांच्या आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक
आरोग्यतज्ञांच्या मते, अंड्यांची गुणवत्ता आणि अंड्यांचा स्रोत यावर अवलंबून अंडी खाल्ल्याने कॅन्सर होऊ शकतो. तथापि, अंडी आणि कॅन्सर यांच्यामधील संबंध समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी विविध अभ्यास केले आहेत. काही अभ्यासांनी लोकांच्या आहाराच्या सवयींनाही एक कारणीभूत घटक म्हणून दर्शवले आहे. तथापि, जर तुम्ही एका प्रतिष्ठित स्रोताकडून अंडी खरेदी केली, तर तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही, कारण अंडी प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहेत.
दररोज अंडी खाल्ल्याने कॅन्सर होत नाही, कारण ती प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत. तथापि, खराब झालेली किंवा भेसळयुक्त अंडी खाल्ल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो. पण, याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने अंडी खाऊ नयेत. अंड्यांचे योग्य प्रमाण व्यक्तीचे वय, आहार आणि आरोग्यदायी खाण्याच्या सवयींवर अवलंबून असू शकते. कोलेस्ट्रॉल, हृदयरोग किंवा इतर आरोग्य समस्या असलेल्या लोकांनी आपल्या आहाराबाबत डॉक्टर किंवा पात्र आहारतज्ञांचा सल्ला घ्यावा.
अस्वीकरण – ही बातमी केवळ सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी, तज्ञांचा सल्ला घ्या किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.