• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाइफस्टाइल
  • /हेल्थ
  • /वजन कमी करण्याच्या नादात कसा सुरुय जीवाशी खेळ? बनावट इंजेक्शन करताय घात!

वजन कमी करण्याच्या नादात कसा सुरुय जीवाशी खेळ? बनावट इंजेक्शन करताय घात!

वजन कमी करण्यासाठी औषधांचा वापर वाढत असताना बनावट उत्पादनांचा धोका देखील गंभीर बनत आहे. त्यामुळे फक्त वजन कमी करण्याच्या उद्देशाने स्वतःहून इंजेक्शन घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि औषधाचा अधिकृत स्रोत तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Reported ByPravin Dabholkar
Published: Oct 02, 2026, 06:10 PM IST|Updated: Oct 02, 2026, 06:19 PM IST
joinshare
वजन कमी करण्याच्या नादात कसा सुरुय जीवाशी खेळ? बनावट इंजेक्शन करताय घात!
Image Credit: वजन कमी करण्यासाठी औषधांचा वापर वाढत असताना बनावट उत्पादनांचा धोका देखील गंभीर बनत आहे. त्यामुळे फक्त वजन कमी करण्याच्या उद्देशाने स्वतःहून इंजेक्शन घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि औषधाचा अधिकृत स्रोत तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेह नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या जीएलपी-1 औषधांची भारतात मागणी झपाट्याने वाढत आहे. मात्र या वाढत्या मागणीसोबत बनावट औषधांचा धोका देखील समोर आला आहे. विशेषतः मोंजरा मौंजारो आणि ऑझेम्पिकयांसारख्या प्रसिद्ध औषधांच्या नावाने बनावट उत्पादने विकली जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एप्रिल 2026 मध्ये गुरुग्राममध्ये बनावट मौंजारो इंजेक्शनचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता.

मौंजारो आणि ओझेम्पिक इतकी चर्चेत का आहेत?

मौंजारो मधील टिर्झेपाटाइड आणि ओझेम्पिक मधील सेमाग्लूटाइड  ही जीएलपी-1 प्रकारातील औषधे आहेत. ही औषधे प्रामुख्याने टाइप-2 मधुमेहाच्या उपचारात वापरली जातात. काही औषधांचा वापर डॉक्टरांच्या देखरेखीखाली वजन कमी करण्यासाठीही केला जातो. त्यामुळे वजन झपाट्याने कमी करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांमध्ये या औषधांची लोकप्रियता वाढली आहे. मात्र ही औषधे स्वतःहून घेणे सुरक्षित मानले जात नाही. भारताच्या औषध नियामक यंत्रणेनेही वैद्यकीय देखरेखीशिवाय जीएलपी-1 औषधांच्या वापराबाबत इशारा दिला आहे.

गुरुग्राममध्ये लाखोंचा बनावट मौंजारो साठा जप्त

एप्रिल 2026 मध्ये गुरुग्राममध्ये अधिकाऱ्यांनी सुमारे 56 लाख रुपयांचा बनावट मौंजारो इंजेक्शनचा साठा जप्त केला. तपासात बनावट इंजेक्शन तयार करून त्यांची विक्री केल्याचा आरोप समोर आला. पुढील कारवाईत एका घरातून आणखी बनावट इंजेक्शनचा साठा मिळाल्याचे वृत्त आहे. या प्रकरणामुळे भारतात जीएलपी-1 औषधांच्या वाढत्या मागणीसोबत तयार होणाऱ्या बेकायदेशीर बाजाराकडे लक्ष वेधले गेले.

बनावट इंजेक्शन शरीरासाठी किती धोकादायक?

बनावट औषधामध्ये नेमके कोणते घटक आहेत, त्याचे प्रमाण किती आहे किंवा ते योग्य पद्धतीने तयार झाले आहे का, याची खात्री नसते. त्यामुळे चुकीचा डोस, दूषित पदार्थ किंवा वेगळे औषधी घटक शरीरात जाण्याचा धोका असतो. बनावट मौंजारो मध्ये इन्सुलिनसारखा वेगळा घटक आढळण्याची शक्यता असल्यास रक्तातील साखर धोकादायक पातळीपर्यंत कमी होऊ शकते. गंभीर परिस्थितीत बेशुद्धावस्था, झटके किंवा इतर गुंतागुंत होऊ शकते.

सरकारनेही जीएलपी-1 औषधांवर कडक नजर ठेवली

मार्च 2026 मध्ये केंद्र सरकारने जीएलपी-1 औषधांच्या पुरवठा साखळीवर नियामक देखरेख वाढवल्याचे सांगितले. ऑनलाइन प्लॅटफॉर्म, घाऊक विक्रेते, किरकोळ औषध दुकाने आणि वेलनेस क्लिनिक अशा ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या. अधिकृत माहितीनुसार 49 संस्थांमध्ये ऑडिट आणि तपासणी करण्यात आली असून, अनधिकृत विक्री, चुकीची प्रिस्क्रिप्शन पद्धत आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बनावट औषधांपासून बचाव कसा कराल?

ऑझेम्पिक, मौंजारो किंवा इतर जीएलपी-1 औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खरेदी करू नयेत. औषध अधिकृत आणि परवानाधारक फार्मसीमधूनच घ्यावे. पॅकेजिंग, सील, बॅच नंबर, लेबल आणि एक्सपायरी डेट तपासावी. बाजारभावापेक्षा असामान्यरीत्या कमी किमतीत मिळणारे इंजेक्शन किंवा सोशल मीडिया/अनधिकृत ऑनलाइन विक्रेत्यांकडून मिळणारी औषधे टाळणे महत्त्वाचे आहे. सीडीएससीओनेही अशा औषधांची खरेदी अधिकृत स्रोतांकडून आणि योग्य बिलासह करण्याचा सल्ला दिला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Health News
india