आरोग्य : सगळं सुरळीत सुरू असतं, तारुण्य मनमुरादपणे जगणं, नव्या जबाबदाऱ्या आणि करिअरच्या दिशेनं नवी वाटचाल सुरू असते. पण याच धावपळीत अनेक तरुण मुलींच्या नकळत त्यांच्या हृदयावर गंभीर आघात होत आहेत. युवा तरुणींमध्ये हार्ट डिसिज मध्ये वाढ होत आहे.
तरुण मुलींनो, छातीत होणारी धडधड, सतत येणारी चक्कर किंवा दम लागणे ही केवळ अँक्झायटी किंवा अभ्यासाची चिंता नाहीये. तुमचे शरीर तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आपण तारुण्यात इतक्या नवीन गोष्टींना सामोरे जात असतो की, त्या सगळ्याचा ताण शरीरावर आणि हृदयावर येत असतो. यामुळे छातीत दुखणं, श्वास लागणं किंवा हृदयाचे ठोके अनियमित होणं यांसारख्या त्रासांना सामोरं जावं लागतं. हळूहळू हा त्रास वाढू लागतो. अचानक डोळ्यांसमोर अंधारी येऊन चक्कर येण्याचे प्रकार वाढू लागतात. कधी कधी अगदी निवांत बसलेलं असतानाही हृदयाचे ठोके प्रत्येक मिनिटाला 110 ते 115 पर्यंत पोहोचतात, तर थोडी जरी धावपळ केली तरी ते 150 च्या पार जातात.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा या मुली तज्ज्ञांचा सल्ला घेतात, तेव्हा अनेकदा या मुली मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झाल्याचं दिसून येते. अल्कोहोल , धूम्रपान हे कार्पोरेट लाइफ मध्ये नित्याच्या गोष्टी होत आहेत. विशी-तिशीतल्या तरुणींच्या लेट नाईट पार्टीज वाढत असूनही नियमित तपासण्यांमध्ये, जसे की इको-कार्डिओग्राममध्ये, हृदयाची रचना आणि कार्यक्षमता अगदी सामान्य दिसू शकते.
केवळ ईसीजी तपासणीत धडधड सतत वेगाने धावत असल्याचे दिसू शकते. हृदयातील काही जन्मजात दोष किंवा अडथळ्यांमुळे फुफ्फुसातून शुद्ध रक्त घेऊन येणाऱ्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. यामुळे फुफ्फुसावर प्रचंड दाब निर्माण होतो आणि थोडं जरी चाललं किंवा श्रम झाले तरी दम लागू लागतो आणि प्रचंड थकवा येतो. अशा वेळी आजाराचे मूळ शोधण्यासाठी प्रगत इमेजिंग तपासणी करणे अत्यंत गरजेचे असते. त्यासोबत आपली लाईफ स्टाईल बदलवून स्ट्रेस विना जगणे आवश्यक असते.
तुमचं आयुष्य केवळ करिअर किंवा महत्त्वाकांक्षांपुरतं मर्यादित नसून, ते निरोगी आणि सुरक्षित राहणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.त्यासाठी सजग राहा फिट राहा फक्त आपल्या शरीरातून दिलेल्या संदेशांकडे लक्ष द्या.