SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

टायफॉइड झाल्याचे ज्यावेळी आपल्याला समजेल त्यावेळी त्यावर उपचार करणे गरजेचे आहे. या लेखामध्ये तुम्हाला आम्ही टायफॉइडची लक्षणे, तो टाळण्यासाठी काय करावे आणि काय टाळावे याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 18, 2026, 22:18 IST | Updated: Nov 18, 2026, 22:30 IST
Join

टायफॉइड हा एक असा आजार आहे जो तुम्ही जर अंगावर काढत असाल तर तुम्हाला त्याच्या आणखी समस्या होऊ शकतात. टायफॉइड होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात, टायफॉइड हा दूषित पाणी प्यायल्याने किंवा दूषित अन्न खाल्ल्याने  टायफॉइड तापाचा संसर्ग होतो. जर तुम्ही यावर उपचार नाही केला आणि सातत्याने त्याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला गंभीर समस्या देखील उद्धवू शकतात. टायफॉइड झाल्याचे ज्यावेळी आपल्याला समजेल त्यावेळी त्यावर उपचार करणे गरजेचे आहे. आता नायटेड किंगडमच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेने (National Health Service) टायफॉइडबद्दल माहिती दिली आहे. या लेखामध्ये तुम्हाला आम्ही टायफॉइडची लक्षणे, तो टाळण्यासाठी काय करावे आणि काय टाळावे याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.

टायफॉइडची लक्षणे कोणती आहेत?

टायफॉइडमुळे तुम्हाला तीव्र ताप जाणवू शकतो, 103-104 अंश फॅरेनहाइटपर्यंत शरीरातील पोहोचू शकतो. 
टायफॉइडच्या वेळी शरीरातील ताप हा 3 दिवसांपर्यंत टिकू शकतो. 
तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा देखील जाणवू शकतो. 
पोटदुखी असू शकते
तुम्हाला थंडी जाणवू शकते आणि अंगदुखी होऊ शकते.
बद्धकोष्ठता किंवा अतिसार ही एक समस्या असू शकते.
खोकला येऊ शकतो
भूक कमी होऊ शकते
बऱ्याच लोकांना त्यांच्या शरीरावर सपाट गुलाबी ठिपके दिसू शकतात.

टायफॉइड टाळण्यासाठी काय करावे?

टायफॉइड टाळण्यासाठी चांगली स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. शौचालय वापरल्यानंतर आणि स्वयंपाक करण्यापूर्वी साबण आणि पाण्याने हात धुण्याची सवय लावा. साबण उपलब्ध नसल्यास हँड सॅनिटायझर वापरा. ​​पूर्णपणे शिजवलेले आणि झाकलेले अन्न खा. अपाश्चरीकृत दुधापासून बनवलेले चीज, दही किंवा आईस्क्रीम खाणे टाळा. न झाकलेले अन्न खाणे टाळा. टायफॉइड झालेल्या व्यक्तीने तयार केलेले किंवा वाढलेले अन्न खाणे टाळा.

हे ही वाचा

निमोनियाकडे दुर्लक्ष करू नका! 'ही' लक्षणे दिसताच काय करावे, जाणून घ्या डॉक्टरांकडून

टायफॉइड ताप हा एक गंभीर पण उपचार करण्यायोग्य आजार आहे. त्याची लक्षणे लवकर ओळखणे, वैद्यकीय उपचार घेणे आणि चांगली स्वच्छता राखणे हे तो टाळण्याचे सर्वोत्तम मार्ग आहेत. स्वच्छ पाणी पिणे, संतुलित आहार घेणे आणि वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे यामुळे टायफॉइडचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. जर तुम्हाला सतत जास्त ताप किंवा टायफॉइडसारखी लक्षणे जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या

अस्वीकरण – ही बातमी केवळ सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी, तज्ञांचा सल्ला घ्या किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES