18 वर्षीय तरुणीच्या घशात अडकली सेफ्टी पीन, कारण ऐकून डॉक्टरांनी डोक्याला हात मारला
काहीजण तात अडकलेली वस्तू काढण्यासाठी टोकदार अशा सेफ्टी पिनचा वापर करतात. पण हे करणं एखाद्याच्या जीवावर बेतू शतक हे जळगावमधील एका घटनेनं समोर आलेलं आहे. दात कोर्ट असताना 18 वर्षीय तरुणीच्या घशात सेफ्टी पीन अडकली.
सेफ्टी पीनचा उपयोग दररोजच्या वापरात विविध गोष्टींसाठी केला जातो. महिला सेफ्टी पिन त्यांची साडी नेसताना, दुपट्टा बांधताना अशा अनेक गोष्टींसाठी वापरतात. तुम्ही काहीवेळा पाहिलं असेल की सेफ्टी पिनचा वापर करून काहीजण दात कोरतात. दातात अडकलेली वस्तू काढण्यासाठी टोकदार अशा सेफ्टी पिनचा वापर करतात. पण हे करणं एखाद्याच्या जीवावर बेतू शकत. नुकतीच अशीच एक घटना घडली ज्यात एका 18 वर्षीय तरुणीच्या घशात ही सेफ्टी पिन अडकली.
दात कोरताना चुकून सेफ्टी पीन गिळल्याने 18 वर्षीय तरुणीच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची घटना जळगावात समोर आली आहे. दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी तरुणीने टोकदार सेफ्टी पीन वापरली. दात कोरत असताना ती सेफ्टी पिन थेट अन्ननलिकेत अडकली. टोकदार पीनमुळे अन्ननलिकेला छिद्र पडण्यासह अंतर्गत रक्तस्राव होण्याची शक्यता होती. ही पीन बाहेर काढताना अन्ननलिकेला इजा होण्याचा आणि श्वसनमार्गात जाण्याचाही धोका होता.
तरुणीला तात्काळ जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. तेथे कान, नाक आणि घसा विभागाच्या डॉक्टरांनी यशस्वी वैद्यकीय प्रक्रिया करून तरुणीच्या अन्ननलिकेत अडकलेली पीन बाहेर काढली आणि तरुणीला जीवदान दिले. त्यामुळे तरुणीचे प्राण वाचले. दरम्यान दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी सेफ्टी पीन, सुई यांसारख्या टोकदार वस्तूंचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा वस्तूंचा वापर टाळण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत. पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.