• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /एकनाथ शिंदेच्या 15 खासदारांनी एकत्र येऊन घेतला मोठा निर्णय

एकनाथ शिंदेच्या 15 खासदारांनी एकत्र येऊन घेतला मोठा निर्णय

परिसीमन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खासदारांच्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 28, 2026, 19:52 IST|Updated: Nov 28, 2026, 20:02 IST
joinshare
एकनाथ शिंदेच्या 15 खासदारांनी एकत्र येऊन घेतला मोठा निर्णय

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

2

आपले पैसे वाचवून ठेवा,पुढच्या काळात मोठे आव्हान उभे ठाकणार; खुद्द अर्थ मंत्रालयाचे संकेत;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

3

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

4

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

5

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

एकनाथ शिंदे शिवसेना : संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात सादर होणाऱ्या 'महिला आरक्षणाशी संबधित 'परिसीमन' विधेयकाला पाठिंबा देण्याचा एकमुखी ठराव आज शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या या बैठकीत शिवसेनेचे सर्व 15 खासदार उपस्थित होते. या ऐतिहासिक निर्णयाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्यासाठी सर्व खासदारांनी रविवारीच दिल्लीला पोहोचावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. 

लोकसभेचे सोमवार 30 नोव्हेंबर रोजी तर राज्यसभेचे बुधवार 2 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात घटनादुरुस्ती व परिसीमन विधेयक सरकारकडून मांडली जातील. या विधेयकाद्वारे महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होईल. लोकसभेची एकूण सदस्यसंख्या 50 टक्क्यांनी वाढून 543 वरून 815 इतकी होईल, तर महाराष्ट्रातील लोकसभा जागा 48 वरून 72 होतील. यामुळे दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज अधिक बुलंद होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. 

शिवसेना-भाजप युतीमध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच राष्ट्रहिताची भूमिका घेतली होती, त्याच वाटेवर चालत 'नेशन फर्स्ट' हीच शिवसेनेची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. एनडीएच्या बैठकीत शिवसेनेला नेहमीच महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे. 7 टक्के जीडीपी दरामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही भारताचे कौतुक केले. देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेचे लोकसभेचे 13 आणि राज्यसभेचे 2 असे सर्व खासदार दोन्ही सभागृहांत विधेयकाच्या बाजूने मतदान करतील, असे ते म्हणाले. 

1976 पासून मतदारसंघांची संख्या गोठवण्यात आली आहे. सद्यस्थितीत एका खासदाराला २० ते २५ लाख नागरिकांचे प्रतिनिधित्व करावे लागत आहे. 'एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य' या लोकशाही सूत्रानुसार मतदारांना न्याय देण्यासाठी, तसेच गावे आणि शहरांच्या समतोल विकासासाठी मतदारसंघ पुनर्रचना करणे काळाची गरज आहे. यामुळे खासदारांचे काम सुटसुटीत होईल आणि मतदारांनाही आपल्या लोकप्रतिनिधींची भेट घेणे सोपे जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.  शिवसेना या संविधान दुरुस्ती विधेयकांच्या बाजूने मतदान करणार आहे. हा ऐतिहासिक निर्णय राजकीय परिवर्तनाची नवी क्रांती घडवून आणेल, ज्यामुळे लोकशाही अधिक बळकट होईल आणि तिचा विस्तार होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

आजच्या बैठकीतील ठरावाची प्रत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू आणि केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल व एनडीएच्या प्रमुख नेत्यांना पाठवण्यात येणार आहे. 

मुंबईतील नंदनवन निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग अप्पा बारणे, संदिपान भुमरे, नरेश म्हस्के, रवींद्र वायकर, धैर्यशील माने, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, भाउसाहेब वाकचौरे, डॉ. ज्योती वाघमारे उपस्थित होते. तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार मिलिंद देवरा आणि खासदार संजय दिना पाटील यांनी व्हिसीद्वारे उपस्थिती लावली.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
shiv sena
Eknath Shinde
Maharashtra Politics
Political News