SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाच्या या गडदछायेत छत्रपती संभाजी नगरच्या 36 महिला नगरसेवकांचा दहा दिवसांचा अभ्यास दौरा केरळला जाणार आहे. या दौऱ्याच्या खर्च जवळपास 35 लाख इतका येणार असून त्यावरून सध्या टीका केली जात आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 20, 2026, 13:43 IST | Updated: Nov 20, 2026, 13:56 IST
Image Credit: दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार
Join

विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर : राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे पायाभूत सुविधांसाठीच्या खर्चात सुद्धा राज्य सरकारने कपात केलेली आहे त्याबाबतचे निर्णय स्थानिक अधिकाऱ्यांना घ्यायला सांगण्यात आले मात्र या सगळ्यात छत्रपती संभाजी नगर मनपापमध्ये काही वेगळच सुरू आहे,  दुष्काळाच्या या गडदछायेत छत्रपती संभाजी नगरच्या 36  महिला नगरसेवकांचा दहा दिवसांचा अभ्यास दौरा केरळला जाणार आहे,  आता हा अभ्यास दौरा की पर्यटन आणि ऐन दुष्काळाच्या छायेत का असा सवाल केल्या जातोय.

छत्रपती संभाजी नगर महापालिका, या महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताचीच, अनेकदा तर पगार करायला पैशांची अडचण त्यात  अनेक कामांची बिल वर्षानुवर्षे थकलेली त्यातही ऐन दुष्काळात या महापालिकेच्या 36 नगरसेविका महिला आणि बालकल्याण विभाग अंतर्गत केरळमच्या अभ्यास दौऱ्याला जात आहेत, महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी राबवत असलेल्या योजनांच्या पाहणी साठी महिला नगरसेवकांची ही टीम, तिरुअनंतपुरम, कोझी कोड, कोची, कोल्लम थिसुर, आणि कन्नूर ला भेट देण्यासाठी जाताय, या दौर्यावरून आता नवे वादंग निर्माण झाले आहे, दुष्काळात अनावश्यक खर्चावर राज्य सरकारने निर्बंध आणले आहेत मग हा दौरा कुठल्या निकषात बसतो असा सवाल केल्या जातोय, महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी दौरा आहे ही सर्व प्रसिद्ध पर्यटन केंद्र आहेत इथंच नक्की जाऊन काय अभ्यास करणार असा सवाल केल्या जातोय.

महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी  एक दिवसाचा तर नगरसेवकांनी एक महिन्याच्या  त्यांचा पगार राज्य सरकारच्या दुष्काळ निधीला दिला होता मग दुष्काळाची इतकी जाणीव असतानाही दुष्काळी वेळेतच या 35 लाखांची उधळपट्टी कशाला असा सवाल केला जातोय.  विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने यावर सवाल उपस्थित  केले आहे आणि भाजप शिवसेनेच्या महिला नगरसेवकांना पर्यटन घडवून आणण्यासाठीच या दौऱ्याचा आयोजन केल्याचा त्यांचा आरोप आहे आणि हा दौरा रद्द करण्याची त्यांनी मागणी केली आहे. या उधळपट्टीबाबत महापालिका आयुक्तांना जाब विचारणार असल्याचेही एमआयएमचा म्हणणं आहे.

हेही वाचा : महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

आता विरोधकांनी आवाज उठवल्यावर सत्ताधाऱ्यांची सारवासारव  सुरू झाली आहे दुष्काळ पडण्याच्या आधीच दौऱ्याचा नियोजन केलं आहे आणि हा अभ्यास दौरा आहे त्यामुळे जायला काही हरकत नाही असे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा यावर म्हणणे आहे.

सर्व 36 नगरसेविकांचा विमान प्रवास राहण्यासाठी आलिशान हॉटेल फिरण्यासाठी उत्तम गाड्या असा हा दौरा असणार आहे , याचा सर्व खर्च महापालिकेच्या तिजोरीतून होणार आहे. अभ्यास दौऱ्याला हरकत नाही मात्र दुष्काळी परिस्थितीत विकासाच्या मूलभूत कामांनाही स्थगिती मिळण्याची वेळ आली आहे  त्यात  ज्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यांनी अशी उधळपट्टी करावी का असा सवाल केल्या जातोय. आता यावर लोकप्रतिनिधी आणि महापालिका आयुक्त काय निर्णय घेतात हेच पाहणं महत्त्वाचं असेल.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES