अमरावतीमधील गजानन प्लाझा अपार्टमेंटमधील एका लेकाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. या हत्येसंदर्भात पोलिसांनी मुलगा तुषार सतीश कानफाडे याला अटक केली आहे. 39 वर्षीय तुषार हा एका विदेशी कंपनीमध्ये वर्षाला 20 लाखांच्या पॅकेजवर काम करायचा. आयटी क्षेत्रातील नोकरी आणि वर्क फ्रॉम होम असं सगळं असतानाही त्याने असं कृत्य का केलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 10 ऑक्टोबरला सकाळी साडेनऊच्या ही धक्कादायक घटना घडली. 65 वर्षीय रंजना सतीश कानफाडे यांची मुलगा तुषारने गळा आवळून हत्या केली आहे. हत्येनंतर तुषारने स्वत:हून पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं.
तुषारने पोलिसांना सांगितलं की, आई नेहमी खोटं बोलत असल्यामुळे आपण अडचणीत आलो होतो. याच कारणामुळे मी आईची गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी तुषारच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती काढली तेव्हा समजलं की, काही वर्षांपूर्वी त्याच एका तरुणीसोबत लग्न ठरलं होतं. पण तुषारच्या संशयी स्वभावामुळे हे लग्न मोडलं होतं. घटनेच्या दिवशीही आईसोबत किरकोळ वादातून आई आणि मुलगा तुषार यांच्यामध्ये वाद झाले होते. ज्यावेळी तुषारने आईचा गळा दाबत होता, तेव्हा मी तुझी आई आहे, असं वारंवार विनवणी करत होती, असं खुद्द तुषारने सांगितलं. पण रागाच्या भरात तो काय करतोय, याचा तिला भानच राहिलं नाही.
एवढंच नाहीतर आईच्या हत्या केल्यानंतर तुषार बराच वेळी आईच्या मृतदेहाजवळ बसून होता. नंतर तो स्वत:हून गाडगे नगर पोलीस ठाण्यामध्ये आला आणि त्याने झालेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. दरम्यान आई आणि मुलामध्ये नेमका कशावरून वाद झाला होता, हे मात्र अजून त्याने सांगितलेले नाहीय.