SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर! पूजा, दिवाळी आणि छठ सणानिमित्त विशेष गाड्यांची घोषणा

Central Railway : सणासुदीच्या काळात मध्य रेल्वेने पुणे किंवा हडपसर आणि दानापूर दरम्यान मागणीनुसार अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार वेळापत्रक आणि आरक्षणाची तारीख जाहीर केली आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 24, 2026, 08:45 AM IST | Updated: Oct 24, 2026, 09:14 AM IST
Image Credit: मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर! पूजा, दिवाळी आणि छठ सणानिमित्त विशेष गाड्यांची घोषणा
Join

Central Railway : सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तसेच प्रवाशांना सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेने पुणे किंवा हडपसर आणि दानापूर दरम्यान मागणीनुसार अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रवाशांना सुट्ट्यांच्या निमित्ताने प्रवास करण्यास अधिक सोयीचं होईल. तेव्हा मध्यरेल्वे कोणत्या विशेष रेल्वे गाड्या चालवणार याचे तपशील खाली दिल्याप्रमाणे,

मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा :

गाडी क्र. 01441\ 01442 पुणे – दानापूर – हडपसर विशेष (आठवड्यातून पाच दिवस)

गाडी क्र. 01441 पुणे :  दानापूर विशेष: ही गाडी दिनांक 1 नोव्हेंबर 2026 ते 13 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दर रविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे आठवड्यातून पाच दिवस धावेल. या गाडीच्या एकूण 9 फेऱ्या होतील. ही गाडी पुणे येथून 19: 40 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 7: 00 वाजता दानापूर येथे पोहोचेल.

गाडी क्र. 01442 दानापूर :  हडपसर विशेष: ही गाडी दिनांक 3 नोव्हेंबर 2026 ते 15 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दर मंगळवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे आठवड्यातून पाच दिवस धावेल. या गाडीच्या एकूण 9 फेऱ्या होतील. ही गाडी दानापूर येथून 8:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 17:35 वाजता हडपसर येथे पोहोचेल.

हेही वाचा : रविवारी मेगाब्लॉकमुळे मध्य, हार्बर रेल्वेवर मुंबईकरांचा खोळंबा होणार, कोणत्या लोकलवर परिणाम? पाहा वेळापत्रक

कुठे असणार विशेष गाड्यांचे थांबे?

डब्यांची रचना: या गाडीला एकूण 18 आयसीएफ (ICF) डबे असतील. त्यामध्ये 06  शयनयान श्रेणीचे डबे, 10 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि 02 गार्ड/लगेज व्हॅन  यांचा समावेश असेल.

थांबे: हडपसर (केवळ गाडी क्र.01441 साठी), दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, अनकाई (पासिंग हॉल्ट), मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा (पासिंग हॉल्ट), इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महल, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, न्यू वेस्ट केबिन (पासिंग हॉल्ट), पं.दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.

कधी पासून सुरु होतंय तिकीट बुकिंग?

या विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह आरक्षण दिनांक 27/10/2026 पासून सर्व संगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणाली तिकीट काउंटरवर तसेच IRCTC च्या अधिकृत www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

अनारक्षित प्रवास : सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि निर्धारित गार्ड/लगेज व्हॅन मध्ये अनारक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध असेल. प्रवाशांना यूटीएस प्रणालीद्वारे, यूटीएस मोबाईल ॲप तसेच तिकीट बुकिंग काउंटरवरून सुपरफास्ट/मेल/एक्सप्रेस गाड्यांना लागू असलेल्या नियमित भाडेदराने अनारक्षित तिकिटे खरेदी करता येतील.

प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी मार्गावरील सर्व थांब्यांच्या स्थानकांवरील गाड्यांच्या आगमन व प्रस्थानाच्या अचूक वेळा भारतीय रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या चौकशी पोर्टलवर किंवा अधिकृत NTES मोबाईल ॲपवर तपासून घ्याव्यात. सणासुदीच्या काळात सोयीस्कर प्रवासासाठी प्रवाशांनी या अतिरिक्त विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेतर्फे करण्यात येत आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES