• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /रविवारी मेगाब्लॉकमुळे मध्य, हार्बर रेल्वेवर मुंबईकरांचा खोळंबा होणार, कोणत्या लोकलवर परिणाम? पाहा वेळापत्रक

रविवारी मेगाब्लॉकमुळे मध्य, हार्बर रेल्वेवर मुंबईकरांचा खोळंबा होणार, कोणत्या लोकलवर परिणाम? पाहा वेळापत्रक

Mega Block News Latest : रविवार 25 ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील अनेक रेल्वे सेवा रद्द करण्यात येणार आहे. तेव्हा प्रवाशांनी रविवारी लोकलने प्रवास करण्यापूर्वी एकदा वेळापत्रक तपासून घ्या.

Reported Bypooja pawar
Published: Oct 24, 2026, 07:56 AM IST|Updated: Oct 24, 2026, 08:25 AM IST
joinshare
रविवारी मेगाब्लॉकमुळे मध्य, हार्बर रेल्वेवर मुंबईकरांचा खोळंबा होणार, कोणत्या लोकलवर परिणाम? पाहा वेळापत्रक
Image Credit: रविवारी मेगाब्लॉकमुळे मध्य, हार्बर रेल्वेवर मुंबईकरांचा खोळंबा होणार, कोणत्या लोकलवर परिणाम? पाहा वेळापत्रक

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Mega Block News Latest : रविवार म्हंटलं की मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकलं ट्रेन संदर्भात दृष्टीच्या कामांसाठी काही तासांचा मेगा ब्लॉग घेतला जातो. तसाच मेगा ब्लॉक हा २५ ऑक्टोबरच्या रविवारी सुद्धा घेण्यात येणार आहे.  मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान हा ब्लॉक असेल. त्यामुळे जलद मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून, हार्बर मार्गावरील अनेक लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.

माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान रात्रकालीन ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.

मध्य रेल्वेवर कुठे मेगा ब्लॉक?

रेल्वे स्थानक : माटुंगा ते मुलुंड

मार्ग : अप आणि डाउन जलद

वेळ : सकाळी 11: 05 ते दुपारी 3: 45

परिणाम : ब्लॉकवेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वेवर कुठे मेगा ब्लॉक?

रेल्वे स्थानक : कुर्ला ते वाशी

मार्ग : अप आणि डाउन

वेळ : सकाळी 11: 10 ते दुपारी 4:10

परिणाम : सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष अप आणि डाउन लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ट्रान्स हार्बर आणि बेलापूर उरण पोर्ट मार्गिकेवर लोकल फेऱ्या वेळापत्रकानुसार उपलब्ध राहणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर कुठे मेगा ब्लॉक?

रेल्वे स्थानक : सांताक्रूझ ते गोरेगाव

मार्ग : अप आणि डाउन जलद

वेळ : शनिवारी मध्यरात्रीनंतर 12 : 30 ते रविवारी पहाटे 4:30

परिणाम - ब्लॉकवेळेत सर्व अप आणि डाउन जलद लोकल फेऱ्या अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार असून काही लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Railway News
Marathi News
News in Marathi
Mumbai News