• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /किल्ले रायगडावर महिलांसाठी ड्रेसकोड? एकनाथ शिंदेंना निवेदन सादर, भरत गोगावलेंच्या लेकाची मागणी

किल्ले रायगडावर महिलांसाठी ड्रेसकोड? एकनाथ शिंदेंना निवेदन सादर, भरत गोगावलेंच्या लेकाची मागणी

किल्ले रायगडावर महिलांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात येणार का? अशी चर्चा सध्या होतेय. जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी पाठपुरावा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 28, 2026, 12:14 IST|Updated: Nov 28, 2026, 12:16 IST
joinshare
किल्ले रायगडावर महिलांसाठी ड्रेसकोड? एकनाथ शिंदेंना निवेदन सादर, भरत गोगावलेंच्या लेकाची मागणी
Image Credit: Demand to implement a dress code for women visiting Raigad Fort

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

2

आपले पैसे वाचवून ठेवा,पुढच्या काळात मोठे आव्हान उभे ठाकणार; खुद्द अर्थ मंत्रालयाचे संकेत;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

3

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

4

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

5

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

किल्ले रायगड हा महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराजांची राजधानी म्हणजे रायगड. वर्षभरातून हजारो पर्यटक रायगडाला भेट देण्यासाठी येतात. रायगडावर फिरण्यासाठी येणाऱ्या महिला पर्यटकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याची मागणी सध्या चर्चेत आली आहे.  महाड जिल्हा परिषद सदस्य आणि मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनीही मागणी केली आहे.

किल्ले रायगडावर महिलांसाठी ड्रेस कोड असावा या मागणीसाठी महाडचे जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. गुरुवारी रायगडच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी रायगडावरील एका कार्यक्रमात एका लहान मुलीने विकास गोगावले यांची भेट घेऊन किल्ले रायगडावर महिलांना तोकड्या कपड्यात येण्यास बंदी करावी अशी विनंती केली होती. रायगडावरील कार्यक्रमादरम्यान एका छोट्या मुलीने गडाचे पावित्र्य व अस्मिता जपण्यासाठी पेहरावाबाबत विनंती केल्यानंतर हा मुद्दा पुढे आला आहे.

तसंच,  छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर पर्यटकांच्या पेहरावाबाबत निर्बंध घालण्याचा ठराव अखिल भारतीय मराठा महासंघानेही मांडला असून, ती सध्या केवळ संघटनेची मागणी आहे. अद्याप सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव मांडण्यात आलेला नाहीय

किल्ले रायगडावर महिलांसाठी ड्रेसकोड लागू करण्याची मागणी सध्या चर्चेत असली, तरी सध्या तिथे कोणताही अधिकृत शासकीय ड्रेसकोड लागू केलेला नाही. मात्र रायगडावर कोणताही सक्तीचा ड्रेसकोड नसला तरी ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य लक्षात घेऊन सभ्य पोशाख परिधान करण्यात यावे, अशी मते शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे.

रायगडाचे स्वराज्यासाठी महत्त्व

छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावरून स्वराज्याची राजधानी रायगडावर हलवली. येथूनच संपूर्ण स्वराज्याचा राज्यकारभार, परराष्ट्र धोरणे आणि लष्करी मोहिमांचे नियोजन केले जात असे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला हा किल्ला चारही बाजूंनी खोल दऱ्या आणि उंच कड्यांनी वेढलेला आहे. इंग्रज इतिहासकारांनी याचे वर्णन "पूर्वेकडील जिब्राल्टर" (Gibraltar of the East) असे केले आहे.

हिरोजी इंदुलकर यांनी उभारलेली गडावरील बाजारपेठ घोड्यावरून बसून खरेदी करता येईल अशी रचना, अष्टप्रधान मंडळाचे वाडे, जगदीश्वर मंदिर, आणि पाण्याच्या साठवणुकीची अद्वितीय व्यवस्था ही मराठा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे आहेत. त्यामुळं रायगडावर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Bharat Gogawale
Eknath Shinde
Maharashtra News