• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /वडिलांनी मोबाईलसाठी पैसे दिले नाही, पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाला...; धाराशिवमध्ये भयंकर प्रकार

वडिलांनी मोबाईलसाठी पैसे दिले नाही, पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाला...; धाराशिवमध्ये भयंकर प्रकार

मोबाईल न दिल्याने मुलाने जन्मदात्या मुलाचीच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 13, 2026, 13:52 IST|Updated: Nov 13, 2026, 13:54 IST
joinshare
वडिलांनी मोबाईलसाठी पैसे दिले नाही, पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाला...; धाराशिवमध्ये भयंकर प्रकार
Image Credit: Dharashiv Crime News Son ended his fathers life over refusal to pay for a mobile phone

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मोबाईलसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने केला वडिलांचा खून केल्याची घटना घडली आहे.  धाराशिवच्या येवती येथील ही धक्कादायक घटना असून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेने मोबईलच्या व्यसनापायी जन्मदात्या पित्याचा निर्घृणपणे हत्या झाल्याने माणुसकीला काळिमा फासल्याची चर्चा होताना दिसत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मोबाईल घेण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलानेच जन्मदात्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी फुकारीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील येवती येथे घडली. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, येवती येथे 10 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास श्रीशैल उर्फ बबलू खंडू डोंबाळे (वय 29, रा. येवती, ता. तुळजापूर) याने मोबाईल घेण्यासाठी वडिलांनी पैसे न दिल्याचा राग मनात धरून वडील खंडू पांडुरंग डोंबाळे (वय 56) यांच्या डोक्यात लोखंडी फुकारीने जोरदार वार केले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या खंडू डोंबाळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरेखा खंडू डोंबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीशैल उर्फ बबलू खंडू डोंबाळे याच्याविरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे करीत आहेत.

सर्वत्र दिवाळीचा सण आनंदात साजरा होत असताना केवळ मोबाईल घेण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मुलानेच वडिलांचा खून केल्याची घटना समोर आल्याने येवती परिसरात खळबळ उडाली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, क्षुल्लक कारणातून घडलेल्या या घटनेने कौटुंबिक नात्यांमधील वाढत्या संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दारूच्या नशेत वृद्ध आईची हत्या

दारूच्या नशेत पोटच्या मुलाकडून डोक्यात अवजड वस्तूने वार करून वृद्ध आईची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडे खुर्द येथील धक्कादायक घटना घडली आहे. सारीबाबी रसूल पटेल असे मृत 73 वर्षीय महिलेचे नाव असून त्या दोन्ही डोळ्यांनी अधू होत्या. दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Dharashiv
crime