गोकुळ दूध संघाच्या 25 जागांसाठी आज मतदान. 12 तालुक्यातील 35 केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. तर उद्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. गोकुळची निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले असून नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. हायुतीच्या नेत्यांनी गोकुळ मतदान दिवशी ठरावधारकांना शपथ देताना अजब विधान केलं आहे. बाळू मामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक होतो, असं धक्कादायक वक्तव्य माजी आमदार के. जी पाटील यांनी केलं आहे. के.पी पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत.
कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीदरम्यान महायुतीनं मतदारांना चक्क बाळूमामाची शपथ दिली आहे. यावेळी माजी आमदार के.पी.पाटील यांनी धक्कादायक विधान केलंय. बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेनस्ट्रोक होतो असं वक्तव्य के.पी. पाटील यांनी केलं आहे.
बाळू मामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. गेल्या निवडणुकीत ऐकाने बाळू मामाची शपथ मोडली. त्याच्या घराण्याला राजकीय हादरा बसला, असं धक्कादायक वक्तव्य के.पी. पाटील यांनी केलं आहे. तर, राज्यातील नेत्यांचं या निवडणुकीकडे लक्ष आहे, आमची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, चुकीचं काही करू नका, असा दम राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी ठरावधारकांना दिला आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघ निवडणूकसाठी मतदान सुरु झालंय. जिल्ह्यातील 12 तालुक्यातील एकूण 35 केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरु झालीय. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. ((प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यासाठी 332 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून)) 5 हजार 418 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण 25 संचालकांच्या जागांसाठी 50 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेले वर्षभर गोकुळमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमुळे गोकुळची निवडणूक संपूर्ण राज्यभर पोहोचली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी गोकुळ संघासाठी मतदान करणाऱ्या ठराव धारकांना महायुतीकडून सौंदत्ती डोंगरावर शपथ देण्यात आली होती. कर्नाटकातील सौंदत्ती येथील रेणुका यल्लमा देवीच्या दर्शनावेळी घेतलेल्या शपथांचा व्हिडिओ चर्चेत आला होता. या व्हिडिओमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी सभासदांना उद्देशून बोलताना, ‘मी गद्दारी करणार नाही’, अशी शपथ घेण्याचं आवाहन केलं. तसंच, ‘कागलची अब्रू वाचवण्याचे आता तुमच्या हातात आहे’, असंही ते म्हणताना व्हिडिओमध्ये दिसतात. यल्लमा देवी जागृत असून खोटं करणाऱ्याच्या अंगावर उठते, असं वक्तव्यही मुश्रीफ यांनी केल्याचं दिसून येत आहे.