• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छठपुजेचा जनसागर पाहून राज ठाकरेंची 2-5 लोकं पळून जातील,गुणरत्न सदावर्तेंचे ठाकरेंना आव्हान!

छठपुजेचा जनसागर पाहून राज ठाकरेंची 2-5 लोकं पळून जातील,गुणरत्न सदावर्तेंचे ठाकरेंना आव्हान!

छठपूजेच्या वादावरून गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाले आहेत. राज आणि उद्धव ठाकरेंना थेट आव्हान देत त्यांनी पोलिसांत तक्रार केल्याचा दावा केला. नेमकं काय म्हणाले सदावर्ते? जाणून घेऊया.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 13, 2026, 21:02 IST|Updated: Nov 13, 2026, 21:14 IST
joinshare
छठपुजेचा जनसागर पाहून राज ठाकरेंची 2-5 लोकं पळून जातील,गुणरत्न सदावर्तेंचे ठाकरेंना आव्हान!
Image Credit: गुणरत्न सदावर्ते

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबईतील छठपूजा आणि भोजपुरी गाण्यांवरून सुरू असलेल्या राजकीय वादात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी दोघांच्या राजकारणाला ‘रसातळाला गेलेले राजकारण’ म्हटले. कधी कुंभमेळा तर कधी छठपूजेच्या मुद्द्यावरून विरोध केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “यांना देशाची व्याख्या माहिती आहे का?” असा सवालही सदावर्ते यांनी उपस्थित केला. ठाकरे बंधूंची भूमिका ही वैचारिक दिवाळखोरी असल्याची टीका त्यांनी केली. काय म्हणाले सदावर्ते? सविस्तर जाणून घेऊया.

‘छठपूजा सुरू असेल तिथे येऊन दाखवा’

सदावर्ते यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले. “तुम्ही पूजा सुरू असेल त्या ठिकाणी येऊन दाखवा,” असे ते म्हणाले. छठपूजा मुंबईत तसेच उल्हास नदीच्या परिसरातही होणार आहे. पूजा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कायदेशीर मार्गाने उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. छठपूजा हा हिंदूंचा धार्मिक सण असून श्रद्धेने पूजा करण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. छठपुजेला जनसागर येईल, तो पाहून राज ठाकरेंची 2-5 लोकं पळून जातील, असे ते म्हणाले.

भोजपुरी गाण्यांना ‘डान्स बार गीत’ म्हणण्यावर आक्षेप

मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर छठपूजेनिमित्त भोजपुरी गाणी वाजवण्यात आली होती. या प्रकारावर मनसेने आक्षेप घेतला होता. राज ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधत मराठी आणि उत्तर भारतीयांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. यावर सदावर्तेंनी प्रत्युत्तर दिले. उत्सवी गीतांना डान्स बारमधील गाणी म्हणणे ही सांस्कृतिक दिवाळखोरी आहे. ‘बिहारी’ म्हणून कोणाचा अपमान करणे हे संविधानाच्या भावनेविरोधात असल्याचेही त्यांनी म्हटले.

कारवाईची मागणी

छठपूजेच्या विरोधात आणि संबंधित वक्तव्यांबाबत आपण पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. छठपूजेच्या आयोजनात अडथळे निर्माण झाल्यास कायदेशीर लढा देण्याची तयारी असल्याचे ते म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा उल्लेख करत सदावर्ते यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे आवश्यक परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले.

छठपूजेच्या मुद्द्यावर राजकारण पेटले

सदावर्ते यांनी महाराष्ट्र सरकारला छठपूजेसाठी परवानगी देण्याची विनंती केली. राज ठाकरे यांनी मात्र या संपूर्ण वादामागे भाजपचे राजकीय हित असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे सोनू सूद यांनी आपण छठपुजेला उपस्थित राहणार असल्याचे म्हणत वादात उडी घेतली आहे.  त्यामुळे हा वाद केवळ एका धार्मिक उत्सवापुरता मर्यादित न राहता भाषिक अस्मिता आणि राजकीय भूमिकांशी जोडला गेला आहे. आता राज्य सरकार, रेल्वे प्रशासन आणि पोलीस यांची भूमिका काय राहते, याकडे लक्ष लागले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Mumbai News