रोहित आणि विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार? भारताच्या पुढील सीरिजचं शेड्युल समोर
IND VS SL ODI Series : रोहित विराट यांनी टेस्ट आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने ते फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसतात. तेव्हा टीम इंडियाची आगामी वनडे सीरिज कधी होणार याविषयी जाणून घेऊयात.
IND VS SL ODI Series : भारतीय संघ सध्या शुभमन गिलच्या नेतृत्वात न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिजचा शेवटचा सामना खेळत आहेत. तर फॅन्सला पुन्हा रोहित शर्मा आणि विराट कोहली हे टीम इंडियाच्या जर्सीत मैदानात कधी दिसणार याबाबत उत्सुकतता लागली आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर खेळवण्यात आलेल्या वनडे सीरिजमध्ये हे दोन दिग्गज क्रिकेटर खेळताना दिसले होते. रोहित विराट यांनी टेस्ट आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने ते फक्त वनडे सीरिजमध्ये खेळताना दिसतात. तेव्हा आता टीम इंडियाची पुढील वनडे सीरिज कोणाविरुद्ध असणार याचं संपूर्ण वेळेपत्रक आता समोर आलं आहे.
भारतीय संघाची आगामी वनडे सीरिज ही श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. तीन सामन्यांच्या सीरिजची सुरुवात ही 13 डिसेंबर रोजी होणार आहे. हा श्रीलंकेचा भारत दौरा असेल. पहिला सामना हा विशाखापट्टणममध्ये होईल. वनडे सीरिज ही तीन सामन्यांची असणार असून तेवढ्याच सामन्यांची टी20 सीरिज सुद्धा खेळवली जाणार आहे. टी20 सीरीजचा पहिला सामना हा 22 डिसेंबर रोजी खेळवला जाईल.
वनडे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नसली, तरी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. हे दोन्ही खेळाडू या फॉरमॅटसाठी उपलब्ध आहेत आणि सध्या ते पूर्णपणे तंदुरुस्त आहेत, त्यांना कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
हेही वाचा : 'मला वाईट वाटतंय की....', मोहम्मद सिराज सोबत झालेल्या अन्यायावर कपिल देव यांचं विधान
भारत विरुद्ध श्रीलंका वनडे सीरिज वेळापत्रक :
13 डिसेंबर पहिला वनडे: विशाखापट्टनम
16 डिसेंबर दूसरा वनडे: बंगळुरू
19 डिसेंबर तीसरा वनडे: अहमदाबाद
भारताचा संभाव्य संघ :
शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड़, नमन धीर, केएल राहुल, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अंशुल कंबोज, अर्शदीप सिंह, गुरनूर बरार, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.