SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

गोकुळचं अध्यक्ष बनल्यानंतर राजेश पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, '63 वर्षांनंतर...', विरोधकांना उद्देशून केली मोठी घोषणा

गोकुळ अध्यक्षपदाची घोषणा झाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश पाटील यांनी मोठी घोषणा केली.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 10, 2026, 16:40 IST | Updated: Nov 10, 2026, 16:43 IST
Image Credit: Rajesh Patil first reaction
Join

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रतिष्ठेची बनलेली गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार राजेश पाटील यांची निवड झाली आहे. महायुतीच्या या विजयामुळे सतेज पाटलांना जोरदार धक्का बसला आहे. राजेश पाटील यांनी सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत चुयेकर यांचा 16 विरुद्ध 13 मतांनी पराभव करत गोकुळ संघावर महायुतीची सत्ता आली आहे. अध्यक्षपदाची घोषणा झाल्यानंतर राजेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना मोठी घोषणा केली.

राजेश पाटील काय म्हणाले?

अध्यक्षपदी निवडणूक झाल्यानंतर राजेश पाटील म्हणाले की, 63 वर्षानंतर चंदगड सारख्या डोंगराळ, दुर्गम भागाला आज गोकुळमध्ये प्रतिनिधीत्व मिळालं. या भागातून चांगल्या प्रतीच्या दुधाचा गोकुळला पुरवठा आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहेत. आज खऱ्या अर्थाने हसन मुश्रीफ यांच्यासारख्या नेत्यांनी माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या खांद्यावर गोकुळची जबाबदारी सोपवली आहे. मला विश्वास आहे की या वर्षभराच्या कार्यकारभात या सर्व 25 संचालक, चार शासन नियुक्त संचालक आणि दोन स्वीकृत संचालक असे 31 जण मिळून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करु. गोकुळचं वैभव कशाप्रकारे वाढवता येईल यासाठी मी प्रयत्न करेल. गोकुळला देशपातळीवर कशी नेता येईल यासाठी प्रयत्न करणार.  गेल्या वर्षभरातला तोटा भरून काढण्यासाठी नियोजन करु.

हेसुद्धा वाचा -  कोण आहेत राजेश पाटील? अजित पवारांचे 'राईट हँड' ते फेटा न बांधण्याची घेतली भीष्मप्रतिज्ञा


विरोधकांना उद्देशून राजेश पाटील म्हणाले की,  पुढच्या महिन्यात या संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी लागणार आहे. माझी सर्व मंडळींना विनंती आहे की, ज्यांनी निवडणुकीच्या वेळी विरोधक म्हणून लढलेले आहेत. निवडणुका संपलेल्या आहेत, अध्यक्षपदाची निवड झाली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक झाली आहे. आता राजकारण करण्यापेक्षा दूध उत्पादक शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय तुम्ही आणि आम्ही सर्वांनी हातात हात घालून करणे गरजेचे आणि अपेक्षित आहे असं मला वाटतं. झालं गेलं सगळं विसरून एक दिलाने एक मनाने गोकुळ आणि सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचं कार्य इथून पुढील पाच वर्षांमध्ये करूयात.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES