गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली असून महायुत्तीची सत्ता आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. राजेश पाटील पहिल्यांदा चर्चे आले ते त्यांच्या त्या भीष्मप्रतिज्ञामुळे. जोपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री बनत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा त्यांनी घेतली होती. राजेश पाटील हे अजित पवारांचे 'राईट हँड' मानले जायचे. तर राजेश नरसिंगराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार असून कोल्हापूरच्या चंदगड मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केलंय. या विजयामुळे आता त्यांच्या खांद्यावर सहकार क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी पडली आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत राजेश पाटील यांच्या भाजप बंडखोर शिवाजी पाटील यांनी पराभव केला होता. राजेश पाटील यांना राजकारणाचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे. राजेश पाटील यांचे वडील नरसिंग गुरुनाथ पाटील हे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. नरसिंग गुरुनाथ पाटील यांनी 1990 आणि 1999 मध्ये आमदार म्हणून काम केलं. त्यामुळे वडिलांच्या राजकीय कारकिर्दीचा प्रभाव राजेश पाटील यांच्यावर लहानपणापासून पडला. वडिलांचा वारसा पुढे नेत त्यांनीही चंदगडच्या राजकारणात सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत त्यांनी विजय पटकावला होता. पण 2024 मध्ये अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील त्यांचा 24 हजार मतांच्या फरकाने पराभव केला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार
शिवेसनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे मेहुणे
2019 साली चंदगड विधानसभा मतदारसंघातून आमदार
गेल्या गोकुळ निवडणुकीच्या वेळी राजेश पाटील यांच्या पत्नी आणि माजी खासदार संजय मंडलिक यांचं चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांचा पराभव
मागच्या वेळी गोकुळ निवडणुकीमध्ये झालेला पराभव मंडलिक आणि राजेश पाटील यांच्या जिव्हारी
हसन मुश्रीफ यांच्यावर मंडलिक गटाकडून टीकाही झाली होती.
दरम्यान हसन मुश्रीफ गटाकडूनच राजेश पाटील यांना गोकुळ अध्यक्ष पद मिळाल्याने राष्ट्रवादीचा अध्यक्ष गोकुळ संघाला मिळाला आहे