गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीवरुन सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना शासन नियुक्त संचालकांची नावे चर्चेत आली आहेत. बँकिंग क्षेत्रातील निवृत्त अधिकारी शिवाजीराव अडनाईक, सनदी लेखापाल के डी पाटील, डॉ. प्रवीण हेंद्रे आणि प्रकाश पाटोळे यांची नावे चर्चेत आहेत.या नावाची घोषणा लवकरच होईल अशी चर्चा आहे. महायुतीने शासन नियुक्त यादीमध्ये राजकीय पक्षा ऐवजी सहकार, बँकिंग, कायदा क्षेत्रातील तज्ञ संचालकाना संधी देण्याचे निच्छित केल्याचे बोलले जात आहे.
या नावाची घोषणा लवकरच होईल अशी चर्चा आहे. महायुतीने शासन नियुक्त यादीमध्ये राजकीय पक्षा ऐवजी सहकार, बँकिंग, कायदा क्षेत्रातील तज्ञ संचालकाना संधी देण्याचे निच्छित केल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे सरकारने शासननियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतल्यामुळे उद्या समविचारी आघाडीने कोल्हापुरात संघर्ष मोर्चाची हाक दिलीय. महायुतीकडून गोकुळवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप सतेज पाटलांनी केलाय. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. गोकुळवर कब्जा करण्याचा सरकारचा कुठलाही इरादा नाही, केवळ वैधानिक पेच टाळण्यासाठीच आपण शासननियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
संचालकांचा नवीन कायदा आणण्याऐवजी कोरमचा नियम रद्द करण्याचा कायदा का आणला नाही?, असा सवाल काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारलाय. 10 नोव्हेंबरला सभेला उपस्थित राहून गोकुळचे शिल्पकार दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील यांचा चेअरमन होण्याचा मार्ग सुकर करावा, असंही त्यांनी म्हटलंय...