SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

अमरावतीच्या डॉक्टर वैशाली भोजने यांच्या रुग्णालयातून कथित नवजात बाल विकल्याच्या प्रकरणात धक्कादायक आणि मोठा खुलासा करण्यात आला आहे. या प्रकरणी आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 20, 2026, 13:21 IST | Updated: Nov 20, 2026, 13:41 IST
Image Credit: maharashtra infant trafficking scam dr vaishali bhojne confessed police about giving away six newborns over 12 years
Join

महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या अमरावतीतील नवजात बाळ विक्री प्रकरणाला आता मोठं वळण मिळालं आहे. मुख्य आरोपी असलेल्या  डॉ. वैशाली भोजने आणि त्यांचे पती प्रफुल्ल भोजने यांनी चौकशीतून आणखी एक हादरणारा खुलासा केला आहे. डॉक्टर भोजने कडून मानवी तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून खोटी प्रसूती दाखवून नवजात बाळाचा जन्म दाखला तयार करुन घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेने अमरावती महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे.

डॉक्टर वैशाली भोसले यांच्यावर बाळ विक्रीचे गंभीर आरोप असताना आता त्यांच्याविषयी आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात खळबळ घडवून आणली आहे. डॉ. वैशाली भोजने यांनी एका दाम्पत्याला विकलेल्या बाळाची खोटी प्रसूती दाखवून अमरावती महापालिकेतून जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणात डॉक्टरांसह काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे. 2014 मध्ये जन्मलेले हे बाळ आता 12 वर्षांचे झाले आहे. तब्बल बारा वर्षांनंतर या प्रकाराचा पर्दाफाश झाल्याने वैद्यकीय क्षेत्रासह महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणात महापालिकेतील कोणत्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे, जन्म प्रमाणपत्र देताना नियमांची पायमल्ली झाली का? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

काय आहे प्रकरण?

अमरावती शहरात १५ ऑक्टोबर रोजी उघडकीस आलेल्या नवजात बाळ विक्रीच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. अल्पवयीन मुलीची प्रसूती आपल्या खासगी रुग्णालयात करून तिच्या नवजात बाळाची तब्बल 3 लाख 50 हजार रुपयांत विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप या दाम्पत्यावर आहे. या प्रकरणात यापूर्वीच चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये बाळाच्या वडिलांचाही समावेश आहे.

अमरावती महानगरपालिकेने संबंधित रुग्णालयाची तपासणी करून डॉ. भोजने दाम्पत्याच्या हॉस्पिटलला सील ठोकले. दरम्यान, डॉक्टर वैशाली भोजने यांनी बारा वर्षात सहा बाळ दुसऱ्यांच्या स्वाधीन केले असा धक्कादायक खुलासा पोलीस जबाबातून पुढे आला आहे. बाळ घेणाऱ्यांकडून पालकांना पन्नास हजार ते दीड लाखांपर्यंत रक्कम मिळाली असून अल्पवयीन मुलीची प्रसूती करून तिचे बाळ विकल्याचा गंभीर आरोप डॉक्टर वैशाली भोजने यांच्यावर आहे. 

बाळ विकल्यानंतर मिळालेली रक्कम जैविक पालकांना देण्यात आली मात्र आपण रक्कम न घेतल्याचा भोजने यांचा दावा असून भोजने दाम्पत्याला 20 नोव्हेंबर पर्यंत वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES