रविवारी मेगाब्लॉकमुळे मध्य, हार्बर रेल्वेवर मुंबईकरांचा खोळंबा होणार, कोणत्या लोकलवर परिणाम? पाहा वेळापत्रक
Mega Block News Latest : रविवार 25 ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील अनेक रेल्वे सेवा रद्द करण्यात येणार आहे. तेव्हा प्रवाशांनी रविवारी लोकलने प्रवास करण्यापूर्वी एकदा वेळापत्रक तपासून घ्या.
Mega Block News Latest : रविवार म्हंटलं की मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकलं ट्रेन संदर्भात दृष्टीच्या कामांसाठी काही तासांचा मेगा ब्लॉग घेतला जातो. तसाच मेगा ब्लॉक हा २५ ऑक्टोबरच्या रविवारी सुद्धा घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान हा ब्लॉक असेल. त्यामुळे जलद मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून, हार्बर मार्गावरील अनेक लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.
माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान रात्रकालीन ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.
मध्य रेल्वेवर कुठे मेगा ब्लॉक?
रेल्वे स्थानक : माटुंगा ते मुलुंड
मार्ग : अप आणि डाउन जलद
वेळ : सकाळी 11: 05 ते दुपारी 3: 45
परिणाम : ब्लॉकवेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वेवर कुठे मेगा ब्लॉक?
रेल्वे स्थानक : कुर्ला ते वाशी
मार्ग : अप आणि डाउन
वेळ : सकाळी 11: 10 ते दुपारी 4:10
परिणाम : सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष अप आणि डाउन लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ट्रान्स हार्बर आणि बेलापूर उरण पोर्ट मार्गिकेवर लोकल फेऱ्या वेळापत्रकानुसार उपलब्ध राहणार आहेत.
पश्चिम रेल्वेवर कुठे मेगा ब्लॉक?
रेल्वे स्थानक : सांताक्रूझ ते गोरेगाव
मार्ग : अप आणि डाउन जलद
वेळ : शनिवारी मध्यरात्रीनंतर 12 : 30 ते रविवारी पहाटे 4:30
परिणाम - ब्लॉकवेळेत सर्व अप आणि डाउन जलद लोकल फेऱ्या अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार असून काही लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.