SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'उद्धव ठाकरेंनंतर कोणाचे...', सुप्रीम कोर्टाची एकनाथ शिंदेंच्या वकिलांना विचारणा, ध्रुव मेहता म्हणाले, 'शिवसेनेने...'

शिवसेना चिन्ह आणि पक्षासंदर्भात आज एकनाथ शिंदेंच्या वतीने ध्रुव मेहता यांनी आपला युक्तिवाद संपवला आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 18, 2026, 16:00 IST | Updated: Nov 18, 2026, 16:05 IST
Image Credit: एकनाथ शिंदेंच्या वतीने ध्रुव मेहता यांनी आपला युक्तिवाद संपवला
Join

उद्धव ठाकरे यांनी बहुमत गमावले होते, सभागृहाचा विश्वासही गमावला होता. 34 आमदार सरकारसोबत नव्हते, यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले हे स्वतः ठाकरे गटाचे म्हणणे आहे. सुभाष देसाई प्रकरणात ठाकरे गटाने हे स्वतः नमूद केले आहे असा युक्तिवाद एकनाथ शिंदेंच्या वतीने ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता यांनी सुप्रीम कोर्टात केला आहे. शिवेसना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील आपला युक्तिवाद त्यांनी संपवला आहे. सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंनंतर महाराष्ट्रात कोणाचं सरकार आलं याबाबत विचारणा केली.

उद्धव ठाकरे यांच्या सरकारनंतर कोणाचे सरकार स्थापन झाले? असा सवाल कोर्टाने विचारल्यानंतर ध्रुव मेहता यांनी भाजपासोबत शिवसेनेने सरकार स्थापन केले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असं उत्तर दिलं. 3 आणि 4 जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले. राजन साळवी यांनी व्हीप जारी करत सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या आदेश दिले अशी माहिती त्यांनी दिली,

भाजप आणि शिवसेनेमध्ये 2019 मध्ये निवडणूकपूर्व युती झाली होती. मात्र, यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेनेने सत्ता स्थापन केली. यामुळे पक्षामध्ये प्रचंड नाराजी होती, पक्षाने विचारधारा सोडून युती केली म्हणून नेते आणि कार्यकर्ते नाराज होते असा मुद्दा ध्रुव मेहता यांनी मांडला. एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता आणि भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून निवडलेल्या ठरावाचा भाग वाचून दाखताना त्यांनी 34 आमदारांनी या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या अशी माहिती दिली.

राजकीय पक्षातील मतभेद संपवण्यासाठी किंवा त्यावर तोडगा काढण्यासाठी बहुमत चाचणी हा पर्याय होऊ शकत नाही असा युक्तिवाद त्यांनी केला. तसंच सुभाष देसाई प्रकरणातील निकालानंतर ठाकरे गटाला त्यांच्या अडचणी समजल्या आणि यानंतर एक वर्ष तीन महिन्यांनी त्यांनी आणखी एक प्रतिज्ञापत्र दाखल केले असं सांगितलं. आमदारा पात्रता प्रकरण हे 2022 च्या जून महिन्यात दाखल झाले आणि यानंतर 13 महिन्यांनी म्हणजेच सप्टेंबर 2023 मध्ये शिवसेना ठाकरे गटाने एक प्रतिज्ञापत्र दाखल केले असं त्यांनी सांगितलं.

भाजप शासित राज्यात जाणे म्हणजे अपात्र ठरण्याचे कारण ठरू शकत नाही असं ध्रुव मेहता यांनी सांगिल्यानंतर ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल हसले. कोणत्याही पुराव्याशिवाय निराधार विधान करून आमदारांनी भाजप सोबत मिळून कृती केली आहे, असा युक्तिवाद कलम २(१)(अ) अंतर्गत अपात्रता करण्यासाठी आधार ठरू शकत नाही. तसंच परिच्छेद ४३ मध्येही हे स्पीकरच्या आदेशावरून स्पष्ट केलं असल्याचं नमूद केलं आहे असा मुद्दा त्यांनी मांडला.

पुढे ते म्हणाले, "ठाकरे यांनी कोणाशी, कधी आणि कसा संपर्क साधला याबद्दल कोणताही पुरावा सादर केलेला नाही, त्यामुळे हे आरोप निराधार आहेत. एकदा दोन प्रतिस्पर्धी गट निर्माण झाल्यावर, दोन्ही गट एकमेकांवर अशा प्रकारचे आरोप करू शकतात. जोपर्यंत वास्तविक राजकीय पक्ष कोणता हे ठरत नाही, तोपर्यंत अशा आरोपांना काहीही अर्थ उरत नाही".
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES