• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छत्रपती संभाजीनगर
  • /संपत्तीत वाटेकरी नको म्हणून पोटच्याच मुलाचा बळी, बापाच्या कृत्याने लातूर हादरले

संपत्तीत वाटेकरी नको म्हणून पोटच्याच मुलाचा बळी, बापाच्या कृत्याने लातूर हादरले

मालमत्तेचा हव्यास की माणुसकीचा अंत? वाटेकरी नको म्हणून पोटच्या गोळ्याचाच बळी. लातूरमधील या घटनेने बाप-मुलाच्या नात्यालाच काळिमा फासला आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 10, 2026, 09:37 IST|Updated: Nov 10, 2026, 09:38 IST
joinshare
संपत्तीत वाटेकरी नको म्हणून पोटच्याच मुलाचा बळी, बापाच्या कृत्याने लातूर हादरले
Image Credit: latur crime news father killed 7 year old son over property dispute

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

बाप आणि मुलाचं नातं हे विश्वासाचं. मायेचं आणि आधाराचं असतं.मात्र याच नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना लातूरमध्ये समोर आली आहे. मालमत्तेत वाटेकरी नको म्हणून एका पित्यानेच आपल्या सात वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढंच नाही, तर हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मुलाचा मृतदेह शेतातील नाल्यात फेकून दिलाय. एका पित्यानेच आपल्या पोटच्या गोळ्याचा जीव घेतल्याच्या आरोपाने माणुसकीला काळीमा फासलाय.

मालमत्तेच्या वादातून एका निष्पाप चिमुकल्याचा बळी गेलाय.सात वर्षीय अरमान सय्यद हा आपल्या आईसोबत राहत होता... मात्र कौटुंबिक वादातून त्याच्या हत्येचा कट रचण्यात आला आणि गळा आवळून त्याच्या वडिल युसूफ सय्यद यांनी हत्या करण्यात आली आहे आणि हत्या केल्यानंतर चिमुकल्याचा मृतदेह शेतातील नाल्यात फेकण्यात आला. ज्या वयात अरमानने शाळेत जायचं, खेळायचं आणि बालपण अनुभवायचं होतं, त्याच वयात त्याचा दुर्दैवी अंत झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.शेतातील नाल्यातून चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली... या प्रकरणात संशयित पिता युसूफ सय्यद याला पोलिसांनी अटक केलीय. आता या हत्येमागचं नेमकं कारण आणि इतर बाबींचा पोलीस तपास करत आहेत.

मालमत्तेचा हव्यास माणसाला किती निर्दयी बनवू शकतो, याचा प्रत्यय या घटनेतून आलाय... ज्या पित्याने मुलाच्या भविष्याची स्वप्नं पाहायला हवी होती, त्याच्यावर मुलाचाच जीव घेतल्याचा आरोप आहे... संपत्तीसाठी रक्ताच्या नात्याचाच बळी गेल्याने लातूरमध्ये संताप व्यक्त होतोय... अरमानच्या हत्येने अनेक प्रश्न उपस्थित केलेत. मात्र एका निष्पाप जीवाचं बालपण कायमचं हिरावलं गेलंय.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime
Maharashtra News